मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:04 PM2018-05-09T19:04:25+5:302018-05-09T19:04:25+5:30

१२ वर्षाच्या मुलीवर घरात कोणीच नाही याचा गैरफायदा उठवित पित्यानेच अत्याचार केले.

girl molestation case father arrested | मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

Next
ठळक मुद्देयाप्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पिंपळे निलख येथे जन्मदात्या बापाने स्वत: च्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडित मुलीच्या आईने गावाकडे लातूर येथील चाकूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा मंगळवारी सांगवी पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानुसार नराधम पित्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आई-वडिलांबरोबर पिंपळे निळख येथे राहण्यास आली होती. दोन मुलीपैंकी छोट्या १२ वर्षाच्या मुलीवर घरात कोणीच नाही याचा गैरफायदा उठवित पित्यानेच अत्याचार केले. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने काही दिवस हे लैंगिक अत्याचार सहन केले. घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. मात्र बापाने याप्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेच्या आईला दिली होती. यामुळे याप्रकरणी तक्रार देण्यास विलंब झाला. सांगवी पोलीसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पित्याकडून मुलीवर अत्याचार होत असल्याचा प्रकार फेब्रुवारी मध्ये मुलीच्या आईच्या लक्षात आला होता. मात्र, धमकी दिल्याने पीडित मुलीच्या आईला पोलिसांकडे तक्रार देण्यास विलंब झाला असे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. 
 

Web Title: girl molestation case father arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.