किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासनासाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून ३ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:56 PM2017-12-08T15:56:10+5:302017-12-08T15:59:19+5:30

किल्ले रायगडावर जानेवारीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन करण्यात येणार आहे.

A fund of 3 lakhs from Valhekarwadi villagers and holders for the gold throne of the fort Raigad | किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासनासाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून ३ लाखांचा निधी

किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासनासाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून ३ लाखांचा निधी

Next
ठळक मुद्दे३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन करण्यात येणार पुनरसंस्थापनतीन लाख रुपयांचा धनादेश खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत प्रदान

रावेत : किल्ले रायगडावर जानेवारीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन करण्यात येणार आहे. या सुवर्ण सिंहासन उभारणीसाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून तीन लाख रुपयांचा धनादेश खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत सुवर्ण सिंहासन संकल्प प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या कडे सुपूर्त करीत कर्तव्यपूर्तीचा पहिला टप्पा प्रदान केला.
वाल्हेकरवाडीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या सर्व धारकऱ्यांच्या आग्रहाला मान देवून आज सकाळी सात वाजता संभाजी भिडे गुरुजी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. संजय ब जठर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख अविनाश मरकळे, संपर्क प्रमुख सचिन थोरात, चिंचवड विभाग आणि वाल्हेकरवाडीतील धारकरी संदीप वाल्हेकर, गजानन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आनंदा वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सोमनाथ मुसुडगे, सोमनाथ हरपुडे, हेमंत गवंडे, राजकिरण ठाकूर, तुषार वाल्हेकर, धनंजय म्हस्के, प्रवीण रसाळ, बाळू शिवले, संतोष वाघ, गणेश भुजबळ व सुयोग वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, रसिका वाल्हेकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी गुरुजी म्हणाले, की वाल्हेकरवाडी व चिंचवड परिसरातून वीस ते चाळीस वयोगटातील शेकडो तरुण घेऊन मोहिमेला जानेवारीत सहभागी व्हा व या सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन न्यसाला कर्तव्यपूर्ती म्हणून आपण पिंपरी चिंचवड परिसरातून तीस किलोपर्यंतच्या सुवर्ण संचयनासाठी धनाचे संकलन करा.
यावेळी गो-सेवक खिलारप्रेमी संदीप पोपटराव वाल्हेकर यांच्या गोशाळेला भेट देऊन त्यांनी हा देशी गाई संगोपन उपक्रम घरोघरी व्हावा, याने देशाचे कल्याण होईल, असे मार्गदर्शन केले. वाल्हेकर कुटुंबीयांकडून गुरुजींना विठ्ठल मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन संदीप पोपटराव वाल्हेकर व गणेश भुजबळ यांनी केले.

Web Title: A fund of 3 lakhs from Valhekarwadi villagers and holders for the gold throne of the fort Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे