घरफोडीतील ४ आरोपींना चिंचवडमध्ये अटक; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:27 IST2018-02-26T15:27:13+5:302018-02-26T15:27:13+5:30
गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली.

घरफोडीतील ४ आरोपींना चिंचवडमध्ये अटक; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली.
त्यांच्याकडून २१ गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. २३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
चिंचवडजवळ दुचाकीवर दोन जण संशयित असे दिसून आले, त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना थांबवले विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडील दुचाकींची तपासणी केली. त्यावेळी दुचाकीवर पाय ठेवण्याच्या जागेवर कटावनी, तसेच २ मोबिके, कॅमेरा, घड्याळ अशा वस्तू मिळून आल्या. राजू शंभू देवनाथ (वय १९) मंगेश विजय चव्हाण (वय २२) तसेच त्यांना मदत करणारा माझर नांजो जमादार (वय ३०), चोरीच्या वस्तूची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा अल्ताफ पठाण यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.