पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:29 AM2018-02-21T11:29:17+5:302018-02-21T11:31:47+5:30

राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.

deadbody found in Chikhali, Pimpri Chinchwad, suicide reason not clear | पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पिंपरी चिंचवड येथील चिखलीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

ठळक मुद्देरमाकर फुलचंद राजभर (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावतीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता

पिंपरी : राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. रमाकर फुलचंद राजभर (वय ३०, रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. 
रमाकर यांचे घर गेल्या चार दिवसापासून बंद होते. ते राहत असलेल्या खोलीतून  दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले.
रमाकर यांचे घर गेल्या चार दिवसापासून बंद होते. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडला असता आत रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला.
तो मित्रासह राहत होता. मित्र गावी गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास  करीत आहेत.

Web Title: deadbody found in Chikhali, Pimpri Chinchwad, suicide reason not clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.