रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:55 AM2017-10-19T02:55:24+5:302017-10-19T02:55:55+5:30

अपंगांचे असलेले प्रमाण आणि त्या तुलनेत त्यांना अपंगत्वाचा दाखला देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका रुग्णालयांनाही अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत.

 Disability certificate, YCMH, Talat facilities, State government issued municipal authority | रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार

रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार

Next

पिंपरी : अपंगांचे असलेले प्रमाण आणि त्या तुलनेत त्यांना अपंगत्वाचा दाखला देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका रुग्णालयांनाही अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन रूग्णालयांत दाखला मिळणार आहे. वायसीएमएच व तालेरा रूग्णालयात हा दाखला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील १६ वैद्यकीय महाविद्यालये व ३६ सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णालयांच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना दाखला देण्यात येतो. राज्यात डिसेंबर २०१२ पासून सरकारने संगणकीय दाखला देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सुमारे २७ लाख अपंग व्यक्ती आहेत. सद्य:स्थितीत अपंगत्व दाखला देणाºया संस्थांची संख्या मर्यादित आहे. या संस्था अपुºया संख्येने असल्याने वेळेत दाखला मिळत नसल्याच्या तक्रारी अपंगांकडून वेळोवेळी केल्या जात होत्या. ही बाब लक्षात घेऊन संगणकीय प्रणालीद्वारे अपंगत्वाचा दाखला लवकर मिळावा, यासाठी सरकारने दाखला देणाºया संस्थांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेसह मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका रुग्णालयांना अपंग दाखला देण्याचे अधिकार दिले आहे.
महापालिकेचे चव्हाण रूग्णालय आणि चिंचवड येथील तालेरा रूग्णालय, तर पुणे महापालिकेचे कमला नेहरू रूग्णालय आणि डॉ. कोटणीस रूग्णालय या ठिकाणी यापुढे अपंगत्वाचा दाखला दिला जाणार आहे. अपंगांनी अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त महिन्याच्या आत अपंगांना दाखला द्यावा लागणार आहे.

लष्करासह दोन सरकारी रूग्णालयांनाही अधिकार
मुंबई महापालिकेच्या केईएम रूग्णालय आणि लोकमान्य टिळक स्मृती वैद्यकीय महाविद्यालय या दोन रूग्णालयांना संपूर्ण राज्यातील अपंग व्यक्तींना अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत. राज्यातील दोन सरकारी व लष्कराचे एक अशा एकूण तीन मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य पातळीवरील सर्व भागातून येणाºया रूग्णांसाठी अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत. पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. कोंढवा येथील सरकारी कुष्ठरोग रूग्णालयाला कुष्ठरोगामुळे येणाºया अपंगत्वासाठी राज्यस्तरीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
 

Web Title:  Disability certificate, YCMH, Talat facilities, State government issued municipal authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.