वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:58 PM2018-05-25T12:58:33+5:302018-05-25T15:08:45+5:30

मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली.

Cylinder blast at Labor camp at Wakad | वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट

वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने या आगीत किरकोळ इजा वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पिंपरी-चिंचवड : वाकड येथील शेख वस्ती शेजारी असलेल्या मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यात सुमारे ३ पत्र्याच्या खोल्या जळून खाक झाल्या आहे. अग्निशमक दलाचे जवान व वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सुदैवाने मजूर कामावर गेल्याने मोठी हानी टळली 
        वाकड कस्पटे वस्ती रस्त्यावर शेख वस्ती येथे बांधकाम मजुरांचे कँप आहे. यात सुमारे १५ खोल्या येथे आहेत. यापैकी एका खोलीतील मजूर गावी गेल्याने तिला कुलूप होते. दरम्यान, त्या खोलीतील घरगुती सिलेंडर लीक होऊन तो गॅस बंदिस्त खोलीत पसरला आणि सकाळी त्याचा स्फोट होऊन त्या खोलीसह बाजूच्या खोल्यांना आग लागली. खोल्यांसह जीवनावश्यक वस्तु या आगीत जळून खाक झाल्या. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Cylinder blast at Labor camp at Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.