वाकडमधील कस्पटे वस्तीत सुरक्षा बेल्ट तुटून बांधकाम मजूर ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:00 PM2017-12-28T16:00:21+5:302017-12-28T16:06:10+5:30

वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

Construction worker collapses from safety building in wakad; Filed a crime on contractor | वाकडमधील कस्पटे वस्तीत सुरक्षा बेल्ट तुटून बांधकाम मजूर ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

वाकडमधील कस्पटे वस्तीत सुरक्षा बेल्ट तुटून बांधकाम मजूर ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देडोक्यास गंभीर जखमी झाल्याने मजुराचा झाला मृत्यूवाकड परिसरात सलग दोन दिवसात दोन मजुरांचा सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्याने मृत्यू झाला

पिंपरी : वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. निरापधा धिरेंद्र विश्वास (वय ४४) असे त्या मजुराचे नाव आहे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या मजुराचा सुरक्षा बेल्ट तुटला. तो इमारतीवरून खाली कोसळला. डोक्यास गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. योग्य प्रकारे सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाकड परिसरात सलग दोन दिवसात दोन मजुरांचा सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्याने मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपुर्वी राजू विक्यानंद या मजुराचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणातही कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Construction worker collapses from safety building in wakad; Filed a crime on contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.