भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:47 AM2018-08-24T03:47:23+5:302018-08-24T03:48:41+5:30

शहरातील नागरिकांना विशेषत: महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे

Arrange wandering dogs | भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

googlenewsNext

रावेत : शहरातील नागरिकांना विशेषत: महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव वाढला असून, त्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढत असल्याने या भटक्या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असून, भटक्या कुत्र्यांनी महिला, शालेय विद्यार्थ्यांना चावा घेतल्याच्या घटना शहरात नेहमीच घडत आहेत. महापालिकेकडून श्वानपथक उदासीन झाल्याने मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. यासाठी लवकरात-लवकर भटक्या प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागांत तक्रारी येऊन देखील पालिकेकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे.

महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते. मात्र, तरीही त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही परिसरातून भटकी कुत्री आणून सोडली जात आहेत. त्याचा शोध घेऊन त्या बाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Arrange wandering dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.