पिंपरीत अपर आयुक्त; वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यालयांचे स्थलांतर, गुन्हेगारी घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:05 AM2017-09-28T05:05:52+5:302017-09-28T05:06:03+5:30

गुन्हेगारी घटना वाढू लागल्या असतानाही स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावावर शासन स्तरावर हालचाली थंडावल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याऐवजी पिंपरी-चिंचवड शहरात वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Additional commissioner in Pimpri; Migration of offices of senior officials, increased crime incidents | पिंपरीत अपर आयुक्त; वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यालयांचे स्थलांतर, गुन्हेगारी घटनांत वाढ

पिंपरीत अपर आयुक्त; वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यालयांचे स्थलांतर, गुन्हेगारी घटनांत वाढ

Next

पिंपरी : गुन्हेगारी घटना वाढू लागल्या असतानाही स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावावर शासन स्तरावर हालचाली थंडावल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याऐवजी पिंपरी-चिंचवड शहरात वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे चतु:शृंगीतील कार्यालय पिंपरीत आणण्यात येणार आहे. सध्या परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर जागा निश्चित झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये खून, मारामाºया, बलात्कार, अपहरण, दरोडे, चोºया, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड अशा गंभीर स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. तडीपारीच्या आदेशाचा भंग करून गुंड वावरत असल्याचे आढळून आले आहे. त्यांना अटक करून कारवाई करण्यात आली. कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र, त्या प्रस्तावावरील पुढील कारवाईची प्रतीक्षा न करता, गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरितचा निर्णय घेतला आहे.
उत्तर व दक्षिण प्रादेशिक विभाग अशी प्रशासकीय कामकाजासाठी विभागणी केलेली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचे कार्यालय कोथरूडला स्थलांतरित करण्यात आले आहे. याच धर्तीवर उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होणार आहे. नागरिकांना तातडीक मदत मिळावी, या उद्देशाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गुन्हेगारी घटनांत वाढ : स्वतंत्र नियंत्रण कक्ष
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहआयुक्त राम मांडुरके यांच्याबरोबर शहरातील विविध ठिकाणच्या इमारतींची पाहणी केली. पुणे- मुंबई महामार्गालगतच्या सध्याच्या परिमंडल तीन पोलीस उपायुक्त, सहआयुक्त कार्यालयाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर अपर पोलीस आयुक्तालय आणि नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Additional commissioner in Pimpri; Migration of offices of senior officials, increased crime incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस