‘ती’च्या हस्ते गणरायाला साकडे, अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांनी केली आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:44 AM2017-08-29T06:44:06+5:302017-08-29T06:44:18+5:30

आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले...नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी गायनसेवा अर्पण केली

The 'Aarti' by women in various fields including Amrita Fadnavis | ‘ती’च्या हस्ते गणरायाला साकडे, अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांनी केली आरती

‘ती’च्या हस्ते गणरायाला साकडे, अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांनी केली आरती

Next

पुणे : आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले...नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी गायनसेवा अर्पण केली...स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला ‘ती’ने नव्याने झळाळी दिली...बँकर, गायिका, समाजसेविका आणि मुख्यमंत्र्यांची पत्नी अशी नानाविध ओळख असलेल्या ‘ती’च्या सुरांनी आज ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सायंकाळ मंगलमय झाली. ‘ती’च्या सुरांनी गणरायाला आवाहन करण्यात आले आणि स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीची नव्याने प्रचिती आली. ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘ती’चा गणपतीची आरती सोमवारी अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत पार पडली.
पूजाअर्चा, परंपरांमध्ये कायम पुरुष अग्रणी आणि स्त्री मागे, असे चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळत असताना, ‘लोकमत’ने गेल्या ५ वर्षांपासून रुजवलेल्या समानतेच्या चळवळीला झळाळी मिळत आहे. प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व विधी ‘ती’च्या हस्ते करुन ‘लोकमत’ने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी अमृता देवेंद्र फडणवीस, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, गायक रुपकुमार राठोड, रोझरी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूटचे विवेकअरान्हा, चंद्रलेखा अरान्हा, विनय अरान्हा, दिप्ती अरान्हा, सिमरन जेठमलानी, आॅरेंज काऊंटीच्या संचालक सपना छाजेड, पीएफटी हॉलिडेजच्या नीलम खेडलेकर, धीरेंद्र अ‍ॅडर्व्हटायझिंगचे धीरेंद्र सेंगर आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडली. यावेळी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, व्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित होते.
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘गणरायाची आरती केल्यानंतर शांत आणि समाधानी वाटत आहे. ओतप्रोत भक्तीने प्रेरित होऊन ‘ती’च्या हस्ते गणरायाची आरती होत असून, या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. स्त्रीला सक्षम आणि सशक्त करणारा हा उपक्रम आहे. स्त्री अनेक क्षेत्रे पादाक्रांत करत असताना, आजही अनेक ठिकाणी तिला दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, आम्ही पुरुषांप्रमाणेच सर्व जबाबदाºया जिद्दीने पार पाडू शकतो, गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व कामे करु शकतो, हे स्त्रियांनी दाखवून दिले आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक रीत समाजासमोर येत आहे. स्त्रिया अधिक प्रतिभावान असतात. ही प्रतिभा सिध्द करण्याची संधी त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. अशा चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांचे एकत्रीकरण करण्याची नितांत गरज आहे.
फडणवीस यांनी ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ तर रुपकुमार राठोड यांनी ‘जय गणेश, जय गणेश देवा’ या गाण्यातून गणराया चरणी गायनसेवा अर्पण केली. एकीकडे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत असताना, नारीशक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘लोकमत’ने उचललेले पाऊल ही पुरोगामित्वाची चाहूल असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

लोकमतच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या ‘ती’ चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतूनच मिळाली. स्त्रियांना सन्मान मिळावा, या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी पुण्यात सुरु केलेल्या या उपक्रमाला सुरुवातीला खूप विरोध झाला. परंतु, लोकमत आपल्या हेतूशी कटिबध्द होता. आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘ती’चा गणपती उपक्रम सुरु झाला आहे. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लोकमतने सुमारे २५ वर्षांपासून जनजागृती केली आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाचा एक भाग असलेल्या ‘आर‘ती’चा ताससाठी तब्बल दीड लाख महिलांनी सहभाग नोंदवला. लोकमत नेहमी स्त्री सक्षमीकरणासाठी पुढे आला आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, लोकमत ‘ती’चा गणपती हे उपक्रम याचाच एक भाग आहे. यातूनच स्त्री सक्षमीकरणाची चळवळ सशक्त होणार आहे.
- विजय दर्डा
 

Web Title: The 'Aarti' by women in various fields including Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.