Pimpri Chinchwad: ५९ लाखांचा अपहाराप्रकरणी डाॅक्टरवर गुन्हा दाखल, देहूगाव परिसरातील प्रकार

By नारायण बडगुजर | Published: December 1, 2023 06:57 PM2023-12-01T18:57:58+5:302023-12-01T18:58:12+5:30

देहूगाव येथे फेब्रुवारी ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला...

59 lakh embezzlement; A case has been filed against the doctor | Pimpri Chinchwad: ५९ लाखांचा अपहाराप्रकरणी डाॅक्टरवर गुन्हा दाखल, देहूगाव परिसरातील प्रकार

Pimpri Chinchwad: ५९ लाखांचा अपहाराप्रकरणी डाॅक्टरवर गुन्हा दाखल, देहूगाव परिसरातील प्रकार

पिंपरी : वैद्यकीय व्यवसायासाठी ५९ लाख रुपये घेतले. मात्र, करारामध्ये ठरलेली रक्कम परत न करता अपहार केला. देहूगाव येथे फेब्रुवारी ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. 

ज्ञानेश्वर सीताराम कराळे (५४, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ३०) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. डाॅ. श्रीहरी पांडुरंग डांगे (४६, रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. डांगे याने वैद्यकीय व्यवसायाबाबत करारनामा केला.

त्यानुसार फिर्यादी कराळे यांच्याकडून वेळोवेळी धनादेश व रोखीने ५९ लाख रुपये घेतले. मात्र, करारामध्ये ठरलेली रक्कम डाॅ. डांगे याने फिर्यादी कराळे यांना परत केली नाही. त्या रकमेचा डाॅ. डांगे याने अपहार करून फिर्यादी कराळे यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: 59 lakh embezzlement; A case has been filed against the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.