महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:50 AM2018-06-13T02:50:20+5:302018-06-13T02:50:20+5:30

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.

 2 killed in truck accident 2 injured | महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी

महामार्गावर ट्रक अपघातात २ ठार; २ जखमी

Next

लोणावळा -  पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास खंडाळा (बोरघाट) घाटातील अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावरील वळणावर झाला आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.
मोहम्मद सल्लाउद्दीन (वय ३१), बाबुभाई नावाज (वय ३१, दोघेही रा. कल्याण, बिदर, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून, गंभीर जखमींमध्ये नबीउद्दीन अधुनी (वय २६, रा. कल्याण, बिदर, कर्नाटक), मोहम्मद आझाद (वय ३४, रा. तमिळनाडू) यांचा समावेश आहे.
दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दीन हे तिघेजण त्यांच्या एका वाहनाने काही कामानिमित्त मुंबईला चालले होते. यादरम्यान त्यांचे वाहन खंडाळा बोगदा आणि अमृतांजन पुलाच्या जवळ बंद पडले. त्या वेळी ते नाष्टा करण्यासाठी व चहा पिण्यासाठी दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस चौकीकडे एक्सप्रेस वे मार्गावरून चालले होते. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे सागवान लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या (टीएन-५२/एफ-४७४६) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे चालत असलेल्या मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दीनला ठोकरले. ट्रक लगतच्या डोंगरावर आदळून मार्गावर उलटला. या घटनेत एकाचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत आपत्कालीन पथक आणि महामार्गावरील गस्ती पथकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी सांडलेल्या ट्रकच्या आॅईलमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आॅईलवरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचाºयांनी मार्गावर सांडलेल्या आॅईलवर माती टाकून मार्गावरील मातीची साफसफाई केली. त्यानंतर बाराला वाहतूक सुरू केली.

Web Title:  2 killed in truck accident 2 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.