'The Rock' ड्वेन जॉन्सनची नन्ही परी, पाहा तिचे Cute फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:16 PM2019-12-17T17:16:11+5:302019-12-17T17:19:47+5:30

WWE मध्ये एक काळ गाजवणारा 'The Rock' म्हणजेच ड्वेन जॉन्सन सध्या हॉलिवूड चित्रपटात धमाका उडवून देत आहे.

आठ वर्ष त्यानं WWEची रिंग गाजवली आणि निवृत्तीनंतर त्यानं हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. जगभरात त्याच्या चित्रपटांनी आतापर्यंत 10.5 बिलियन डॉलर इतकी कमाई केली आहे आणि सध्याच्या घडीचा तो सर्वात यशस्वी स्टार आहे.

मियामी युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले होते आणि 1991मध्ये त्याच्या संघांन राष्ट्रीय अजिंक्यपदही पटकावले होते.

1995च्या नॅशनल फुटबॉल लीगच्या ड्राफ्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्याची निवड झाली नाही.

1996मध्ये त्यानं WWEमध्ये एन्ट्री मारली. त्याचे वडील रॉकी जॉन्सन आणि आजोबा पीटर मैव्हिया हेही WWE मध्ये कुस्तीपटू होते.

1998मध्ये त्यानं पहिली WWE Championship जिंकली. त्यानंतर त्यानं अनेक जेतेपदं नावावर केली.

2011 ते 2013 पर्यंत त्यानं WWE मध्ये पार्ट टाईम खेळण्याचा निर्णय घेतला. 2019मध्ये त्यानं WWEमधून निवृत्ती जाहीर केली.

3 मे 1997मध्ये त्यानं डेनी गार्सिया हिच्याशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी आहे.

1 जून 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तो लॉरेन हशियनच्या प्रेमात पडला. The Game Plan या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान 2006मध्ये दोघांची भेट झाली.

18 ऑगस्ट आणि 2019मध्ये दोघांनी विवाह केला आणि तत्पूर्वी हे जोडपं दोन मुलांचे पालक झाले होते.