भावूक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामालला यांना साष्टांग दंडवत घातला, बघा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:44 PM2024-01-22T14:44:36+5:302024-01-22T14:50:27+5:30

यावेळी श्रीराम मंदिरात रामललांच्या स्थापनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना साष्टांग दंडवत घातला.

आज अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र भगवे ध्वज दिसत आहेत. गर्भ गृहात बाल राम अथवा रामलला सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित आहेत.

प्रभू रामचंद्रांना दंडवत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी प्रभू श्रीराम चंद्रांना दंडवत केला होता. यावेळी श्रीराम मंदिरात रामललांच्या स्थापनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना साष्टांग दंडवत घातला.

भावूक होत प्रभू श्रीरामांसमोर साष्टांग झाले पंतप्रधान - रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात साष्टांग दंडवत घातला. त्यांनी प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला. यावेळी ते भावूक झाले होते.

रामलला यांची मनमोहक मूर्ती - राम मंदिराच्या गर्भगृहात रामललांची जी मूर्ती स्थापन करण्यात आली, ती अत्यंत मनमोहक आहे. कृष्ण वर्ण, कपाळावर गंध आणि सोन्याचा मुकूट, विधीवतपणे करण्यात आली रामललांची स्थापना.

पीतांबरावर दिसले रामचंद्र - डोक्यावर मुकूट, हातात सोन्याचा धनुष्य-बाण, पितांबरी वस्त्र आणि कपाळावर गंध, अशा स्वरुपात रामलला दिसत होते.

दागदाणीन्यांनी सजवण्यात आली आहे रामललांची मूर्ती - अयोध्येतील राम ललांची मूर्ती दागदागिन्यांनी पूर्ण पणे सजवण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यजमान होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

प्रभू रामचंद्र यांच्या चरणी लीन झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी - पूजा संपूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभे होते. शहनाईच्या सुमधुर स्वरात बाल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली.

रामलला...