भारतीय पर्यटक सर्वाधिक कोणत्या देशात फिरायला जातात? किती खर्च येतो? याबाबत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:56 PM2023-11-01T13:56:21+5:302023-11-01T14:39:22+5:30

परदेशात असे काही देश आहेत जिथे भारतीयांना भेट द्यायला आवडते.

नवी दिल्ली : सणासुदीचा काळ, सुट्ट्या आणि फिरण्यासाठी परफेक्ट टाईम. पुढील २-३ महिने असेच असणार आहेत. सुट्ट्यांच्या कालवधीत अनेक जण देशातील विविध राज्यांत फिरण्यासाठी जातात. तसेच, काही लोक परदेशातही जातात. यादरम्यान, परदेशात असे काही देश आहेत जिथे भारतीयांना भेट द्यायला आवडते.

थायलंड : हा देश भारतीय नागरिकांना पर्यटनासाठी इतर देशांच्या तुलनेतअव्वल आहे. याठिकाणी 40,000 हून अधिक मंदिरे, समुद्रकिनारे, थाई मसाज, खरेदी आणि बेटांसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रमुख शहरांमध्ये पट्टाया आणि बँकॉक यांचा समावेश होतो. बँकॉकची टूर 15-20 हजार रुपयांमध्ये करता येते.

इंडोनेशिया- भारतीय लोक याठिकाणी बालीला भेट देण्यासाठी जातात. हे समुद्रकिनाऱ्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. थायलंडप्रमाणे या देशातही अनेक सुंदर मंदिरे आहेत. बालीचे नाईट लाईफही खूप रंगीबेरंगी आहे. बालीला जाण्यासाठी तुम्हाला साधारण 70,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

सिंगापूर- हा देश सुंदर इमारती, हॉटेल्स आणि कॅसिनोसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही चायनाटाउनला भेट देण्यासाठी भारतीय पर्यटक जाऊ शकतात. तुम्ही सिंगापूर फ्लायर, बोटॅनिक गार्डन्स, सेंटोसा बेट आणि ऑर्चर्ड रोड इत्यादींना भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला 60-70 हजार रुपये खर्च येऊ शकतो.

मलेशिया- भारतीय पर्यटकांना इतर देशांच्या तुलनेत मलेशिया स्वस्त आहे. 25,000 रुपयांमध्ये तुम्ही येथे प्रवास करू शकता. येथे तुम्ही रेनफॉरेस्ट, पेट्रोनास टॉवर्स, बीच आणि क्वालालंपूरच्या रात्रीच्या जीवनाचा आनंद घेऊ शकता.

युनायटेड किंगडम - या यादीतील पाचवे नाव युनायटेड किंगडम आहे. यूके जुन्या इमारती आणि संग्रहालयांसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटनमधील एडिनबर्ग शहराचे सौंदर्य पाहून तुम्हीही तेथे राहण्याचा निर्णय घेऊ शकता. येथील जुनी शहरे आणि गावे अतिशय सुंदर आहेत. लंडनला जाण्यासाठी तुम्हाला सुमारे एक लाख रुपये मोजावे लागतील.