केरळला जायचा बेत आखताय? मग 'या' गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 09:52 AM2023-08-22T09:52:19+5:302023-08-22T10:09:05+5:30

kerala tourism : नारळाची झाडं, रोमँटिक बॅकवॉटर हाउसबोट्स आणि येथील संस्कृती पर्यटकांच्या मनाला नेहमीच मोहून टाकणारी आहे. ज

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे केरळ हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. नारळाची झाडं, रोमँटिक बॅकवॉटर हाउसबोट्स आणि येथील संस्कृती पर्यटकांच्या मनाला नेहमीच मोहून टाकणारी आहे. जर तुम्ही केरळला जात असाल, तर येथील आयुर्वेदिक स्पा, पारंपरिक नृत्य कथकली अशा काही गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका.

प्रत्येकाला आरामशीर सुट्टी हवी असते. अशा परिस्थितीत केरळमध्ये आयुर्वेदिक स्पा घेणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्हाला मानसिक शांती तर मिळेलच पण निद्रानाश सारख्या अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

केरळला गेलात आणि चहाच्या बागांना भेट दिली नाही, असे होऊच शकत नाही. तुम्ही चहाचे शौकीन असाल तर याठिकाणी जरूर भेट द्या. तुम्ही येथील कानन देवन प्लांटेशन म्युझियमला ​​भेट देऊ शकता.

लोकप्रिय पारंपरिक नृत्य कथकलीचा आनंद घ्या. कथकली पाहण्यासाठी कोचीन कल्चरल सेंटरमध्ये जाता येते. येथे तुम्ही त्यांच्या डान्स मूव्ह्स पाहून स्वतः सुद्धा शिकू शकता.

केरळची स्नेक बोट रेस खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात सुरुवात होते. तुम्ही स्नेक बोट ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत पाहू शकता. याशिवाय जोडपे बॅकवॉटर हाउसबोटमध्ये काही रोमँटिक क्षण घालवू शकतात.

जर तुम्हाला केरळला भेट द्यायची असेल तर हिवाळा हा येथे भेट देण्याची योग्य वेळ आहे. या काळात तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकाल. या मोसमात तुम्ही या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करू शकाल.