पाच वर्षांत तुमची नोकरी जाणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 09:37 AM2023-05-07T09:37:36+5:302023-05-07T09:42:02+5:30

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या वापरामुळे कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ या घटकांवर आमूलाग्र परिणाम होत आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या वापरामुळे कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ या घटकांवर आमूलाग्र परिणाम होत आहेत.

याचेच प्रतिबिंब वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर जॉब्स २०२३ या अहवालात उमटलेले दिसते. या अहवालानुसार येत्या ५ वर्षांत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ६.९ कोटी नवे रोजगार उपलब्ध होतील, तर ८.३ कोटी लोक यामुळे बेकार होतील.

भारतातील रोजगारांचे स्वरूप बदलून टाकण्यात एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ, डेटा विश्लेषक, तसेच वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.

देशातील ६१ टक्के कंपन्यांना असे वाटते की, नव्या धोरणांमुळे रोजगारांमध्ये वाढ होईल. नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे ५९ टक्के कंपन्यांना वाटते, तर डिजिटलच्या व्यापक वापरामुळे नोकऱ्या वाढतील असे ५५ टक्के कंपन्यांना वाटते.

असे चित्र बदलणार (प्रमाण %मध्ये) - प्रभाव टाकणारे घटक भारतजग एआय व मशीन लर्निंग विशेषज्ञ३८४० डेटा विश्लेषक आणि वैज्ञानिक३३३४ बिझनेस डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स२४२४ प्रोजेक्ट मॅनेजर्स२२२५

शिक्षण आणि शेतीमध्ये संधी- शिक्षण क्षेत्रात १० टक्के रोजगार वाढीमुळे तब्बल ३० लाख नवे रोजगार निर्माण होतील.

कृषी विशेषज्ञ, उपकरणे, तसेच अवजारे यांचे ऑपरेटर आदी नोकऱ्यांमध्ये एक तृतीयांशने वाढ होईल.

ई- कॉमर्स विशेषज्ञ, डिजिटल मार्केटिंग, स्ट्रॅटेजी स्पेशालिस्ट आदी नोकऱ्यांमध्ये ४० टक्के नव्या संधी निर्माण होतील.