आज लॉन्च होणार Reliance JioBook, केवळ 20 हजारांत मिळणार 'हे' फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:09 PM2023-07-31T14:09:21+5:302023-07-31T14:17:22+5:30

आज Reliance चा स्वस्त नेक्स्ट जनरेशन JioBook लॅपटॉप लॉन्च होत आहे.

Reliance आज आपला नवीन आणि स्वस्त लॅपटॉप लॉन्च करणार आहे. या लॅपटॉपचे नाव second-gen JioBook आहे. लॉन्चिंगपूर्वीच मीडियामध्ये या लॅपटॉपबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. JioBook अॅडव्हान्स आणि लाईटवेट लॅपटॉप असेल. जाणून घेऊ लॅपटॉपचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

रिलायन्स जिओने ऑक्टोबर 2022 मध्ये Jiobook लॅपटॉप लॉन्च केला आहे. आता या आगामी लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स आणि इतर माहिती समोर आली आहे. JioBook (2023) मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो पूर्वीच्या लॅपटॉपपेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल.

मेजर हायलाइट्सबद्दल बोलायचे तर, या लॅपटॉपचे वजन सुमारे 990 ग्रॅम असू शकते. हा जुन्या Jiobook पेक्षा खूपच हलका असू शकतो. ऑक्टोबरमध्ये लॉन्च केलेल्या लॅपटॉपचे वजन 1.2 किलो आहे. वजन कमी केल्यामुळे हा अपकमिंग लॅपटॉप अधिक पोर्टेबल आणि स्लिम असेल.

दमदार बॅटरी बॅकअप मिळेल- JioBook (2023) युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी कंपनी याला पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देईल. यात युजर्सना चांगली प्रोडक्टिव्हिटी फीचर आणि एन्टरटेनमेंटचा फुल एक्सपीरियंस मिळेल.

4G कनेक्टिव्हिटी मिळेल-युजर्सना Jiobook लॅपटॉपमध्ये 4G सपोर्टची सुविधा मिळेल. याच्या मदतीने युजर्स लॅपटॉपमध्ये अगदी सहज आणि वेगवान इंटरनेट वापरू शकतील. यासोबतच लॅपटॉपमध्ये व्हिडिओ कॉलचेही फीचर मिळेल.

विंडोजला ओएस मिळणार नाही- Jiobook च्या या लॅपटॉपमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमऐवजी JIOos ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाऊ शकते. ही ऑपरेटिंग सिस्टीम अनेक प्रीलोडेड अॅप्ससह येईल, ज्यामध्ये JioMeet, JioCloud आणि Jio Security सारखे अॅप उपलब्ध असतील.

संभाव्य किंमत-JioBook च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

फर्स्ट जेन JioBook- ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च झालेल्या JioBook च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 11.6-इंचाचा HD डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 चिपसेटमध्ये येतो, ज्यामध्ये अॅड्रेनो 610 GPU उपलब्ध आहे.

यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच 128 GB SD कार्ड इन्स्टॉल करता येईल. यात 5000mAh बॅटरी आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 तासांचा बॅकअप देऊ शकते.