आपल्या Smartphone मध्ये नक्की असतील 'हे' 3 खतरनाक Apps! सर्वात पहिले Delete करा; नाहीतर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:30 AM2022-12-06T11:30:07+5:302022-12-06T11:40:37+5:30

गुगलचे (Google) प्रत्येक अॅपवर लक्ष असते. मात्र, काही अॅप्स रडारवरून बाहेरही जातात आणि युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात.

गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) असे अनेक अॅप्स आहेत, जे आपले जीवन सहज आणि सोपे बनवतात. मात्र, याच बरोबर काही असे अॅप्स देखील आहेत, जे इंफेक्टेड असतात. असे अॅप्स युजर्सचा डेटा तर चोरतातच, शिवाय गोपनीयतेलाही धोका निर्माण करतात आणि अगदी युजर्सच्या बँक खात्यापर्यंतही पोहोचतात.

गुगलचे (Google) प्रत्येक अॅपवर लक्ष असते. मात्र, काही अॅप्स रडारवरून बाहेरही जातात आणि युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. महत्वाचे म्हणजे, प्ले स्टोरवरील तीन अॅप्स असे आहेत, जे अत्यंत खतरनाक (Google Play Store 3 dangerous apps) आहेत, असा खुलासा नुकताच एका अहवालात करण्यात आला आहे. सिनॉप्सिस सायबरसिक्योरिटी रिसर्च सेन्टरने हे 3 अॅप गूगल प्ले स्टोरवर फ्लॅग केले आहे. जे अॅटॅकर्स मनमानीपणे चालवतात.

हे आहेत तीन खतरनाक अॅप्स - या यादीत Lazy Mouse, Telepad आणि PC Keyboard ला फ्लॅग केले आहे. हे तिन्ही अॅप्स प्रचंड लोकप्रीय आहेत. गूगल प्ले स्टोरवर हे अॅप्स तब्बल 2 मिलियन युजर्सनी डाउनलोड केले आहेत.

सिनॉप्सिस सायबरसिक्योरिटी रिसर्च सेन्टरने या तिन्ही अॅप्समोध्ये कमकुवत आणि मिसिंग ऑथोराइजेशन आणि इनसक्योर कम्यूनिकेशन उघड केले आहे. जर आपल्या फोनमध्येही हे तीन अॅप्स असतील, तर ते तत्काळ फोनमधून डेलीट करा.

अॅप परमीशन्स बघा - आपण जेव्हा एखादे अॅप डाउनलोड करतो तेव्हा विविध परवानग्या मागितल्या जातात. जसे की, आपण फोटो एडिटिंग अॅप डाउनलोड करताना आपल्याला इंस्टॉलेशनच्या वेळी स्टोरेज स्पेस, फोटो गॅलरी, कॅमेरा आणि मायक्रोफोन पर्यंत पोहोचण्यासाठी रिक्वेस्ट येते. अशात काही फेक अॅप्स आपल्याला वैयक्तीक माहिती मागतात आणि आपणही त्यांना घाई गडबडीत परवानगी देऊन टाकतो. मात्र, आपण परवानगी देण्यापूर्वी संबंधित माहिती लक्षपूर्वक वाचायला हवी आणि नंतरच परवानगी द्यायला हवी.

रिव्ह्यू चेक करा - जेव्हा आपण एखादे अॅप डाउनलोड करता, तेव्हा त्याचा रिव्ह्यू नक्की चेक करायला हवा. तेथे युजर्स आपला अनुभव लिहीत असतात. यावून संबंधित अॅप डाउनलोड करायला हवे, की नको, हे समजते.

किती लोकांनी केलं डाउनलोड - खरे तर अॅप कितीलोकांनी डाउनलोड केले, हे पाहणेही अत्यंत महत्वाचे आहे. जे अॅप कमी लोकांनी डाउनलोड केले असेल, ते इग्नोअर करायला हवे. मात्र, आता हे जे 3 अॅप्स समोर आले आहेत, ते मिलियन्सवर लोकांनी डाउनलोड केले आहेत. अशात आपण रिव्ह्यू चेक करू शकतो.

डिसक्रिप्शन अवश्य वाचा - गूगल प्ले स्टोअरवर अॅपच्या खालच्या भागात क्रिएटर की डिटेल्स शेअर करत असतो. आपण क्रिएटरच्या नावावर क्लिक करून पाहू शकता आणि व्हेरिफाय करू शकता. महत्वाचे हेच की, असेच अॅप्स डाउनलोड करा जे मोठ्या प्रमाणावर लोकांनी डाउनलोड केले आहेत आणि ज्यांचा रिव्ह्यू चांगला आहे.