TikTok सारखेच असणारे 'हे' Apps माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:34 PM2020-07-11T16:34:31+5:302020-07-11T16:53:26+5:30

टिकटॉक सारखीच सुविधा देणारे काही अ‍ॅप्स आता वेगाने व्हायरल होत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया. 

केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे.

टिकटॉकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. टिकटॉक सारखीच सुविधा देणारे काही अ‍ॅप्स आता वेगाने व्हायरल होत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया. 

Mitron हे अ‍ॅप देखील टिकटॉकसारखेच आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध असलेल्या या अ‍ॅपमध्ये ग्लोबल प्लॅटफॉर्मच्या टॉप व्हिडिओचं फीड युजर्सला अ‍ॅप ओपन करताच दिसतं. तसेच शेअरिंगचा ऑप्शन देखील मिळतो.

ट्रेंडिंगमध्ये आलेले Chingari हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे. यावर युजर्संना स्थानिक भाषेचे ऑप्शन मिळतो. शॉर्ट व्हिडिओ शिवाय या अ‍ॅपमध्ये न्यूजसाठी एक खास फीचर देण्यात आले आहे.

टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर Roposo हा अ‍ॅप वेगाने डाऊनलोड झाला. यामध्ये अनेक भारतीय भाषेत व्हिडिओ बनवणे आणि शेयर करण्याचा ऑप्शन यात युजर्संना मिळतो आहे. या अ‍ॅपमध्ये खूप सारे फिल्टर्स देण्यात आले आहे. 

गाना अ‍ॅप प्लॅटफॉर्म हॉटशॉट युजर्संना शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी आणि डायलॉग्सवर लिपसिंक करण्याचा पर्याय देतं. तसेच या अ‍ॅपवर शॉर्ट व्हिडिओ शिवाय स्टोरी देखील शेअर करता येते.

प्रसिद्ध व्हिडिओ अ‍ॅप MX प्लेयर कडून हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. यात खूप कॅटेगरी आहेत. 

ट्रेलवर रेसिपीपासून प्रवास आणि ब्यूटीपर्यंत अनेक कॅटेगरीत क्रिएटर्स व्हिडिओ पोस्ट करता येतात. 

मेड इन इंडिया मोज अ‍ॅप लाखो युजर्संनी आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. 

इंडियन व्हिडिओ अ‍ॅपवर युजर्स शॉर्ट व्हिडिओ क्रिएट आणि शेयर करू शकतात. यावर अनेक भाषेचे व्हिडिओ शेयर करता येतात. ज्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी या भाषेचा समावेश आहे.

​Rizzle हे अ‍ॅप पूर्णपणे भारतात केल्याचा दावा करण्यात येत आहे. या अ‍ॅपवर 60 सेकंदाचे व्हिडिओ बनवले जावू शकतात. हे अ‍ॅप अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही वर उपलब्ध आहे. 

LitLot हे अ‍ॅप फक्त अँड्रॉईड युजर्ससाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये ब्यूटी फिल्टर्स, बॅकग्राऊंड म्युझिक आणि इफेक्ट्सचे ऑप्शन आहेत.