इंजिनिअरींगला प्रवेश घेताय? अगोदर या बाबींचा अभ्यास करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:44 PM2023-06-18T17:44:37+5:302023-06-18T17:50:51+5:30

दहावी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला असून सध्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग प्रवेश मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यातच, करिअर करताना नेमकं कोणत्या क्षेत्रात करावं, कोठे प्रवेश घ्यावा हाही प्रश्न अनेकांना सतावतोय.

दहावी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला असून सध्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग प्रवेश मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यातच, करिअर करताना नेमकं कोणत्या क्षेत्रात करावं, कोठे प्रवेश घ्यावा हाही प्रश्न अनेकांना सतावतोय.

त्यातच, एमएचटी सीईटीचा निकाला जाहीर झाल्यामुळे इंजिनिअरिंगलाही प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. मात्र, इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी आधी काही बाबींची दक्षता घ्यायला हवी.

इंजिनिअरींगल प्रवेश घेताना सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या इंजिनिअरींग शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, हे निश्चित करावे लागेल. कारण, तुमच्या करिअरच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते.

अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला सर्वच माहिती असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये प्रवेश परीक्षा, ऑनलाईन अर्ज, दस्तावेज सत्यप्रति आंदींचा समावेश आहे. वेळतच तुम्हाला अर्ज करावा लागेल.

तुम्हाला संभावित प्रवेश परीक्षेसाठी नियमित अभ्यास करावा लागेल. एक रुपरेषा आखून सखोल आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

आयआयटी गुवाहाटीने १८ जून २०२३ रोजी जेईई एडवांस्ड २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. त्यासोबतच, ज्‍वॉइंस सीट अलॉटमेंट प्रोसेस (JoSAA) १९ जूनपासून सुरू करण्यात येईल.

इंजिनिअरींगला प्रवेश घेताना, ज्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेत आहोत, ते कॉलेज स्थितप्रज्ञ आणि शासकीय मानांकनात आहे का हेही पाहावे लागेल. कॉलेजने सर्वप्रकारच्या मान्यता मिळवलेल्या आहेत याचीही खात्री करायला हवी.

ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेत आहात, त्या कॉलेजची देशपातळीवर रँकींग काय आहे, त्याची गुणवत्ता आणि कॅम्पस याबद्दलही माहिती घ्यायला हवी. नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF), केंद्रीय शिक्षण मंत्रालय दरवर्षी NIRF Rankings जारी करत असते.

संबंधित कॉलेजमधील आर्थिक गणितं, जसं की फीज, शिष्यवृत्ती, ट्युशून फी, पुस्तके, लायब्ररी यासह इतरही कॅम्पस एक्टीव्हीटीसाठी किती खर्च येईल, याचीही माहिती ठेवणे गरजेचं आहे.