ना काटेरी तारांचा पहारा, ना दहशत, अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोकळेपणाने साजरा झाला स्वातंत्र्य दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:36 PM2023-08-15T20:36:41+5:302023-08-15T20:44:36+5:30

Independence Day In Kashmir: देशभरात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर काश्मीरमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे यापूर्वी लोकांच्या व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली.

देशभरात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर काश्मीरमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे यापूर्वी लोकांच्या व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली.

श्रीनगरमध्ये १५ लाख रहिवाशांसाठी आजचा स्वातंत्र्य दिन आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. कारण त्यांना कुठेही काटेरी तारांचा पहारा दिसला नाही.

एकेकाळी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लाक चौकाजवळ पर्यटकांनी तिरंग्यासोबत एक फोटो काढला. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी येथे कडेकोट बंदोबस्त असतो.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काश्मीरमधील लाल चौक नेहमी तिरंग्याच्या रोषणाईने झळाळून गेला होता.

तब्बल दोन दशकांच्या काळानंतर हजारो काश्मीरी नागरिक बक्षी स्टेडियममध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आदिब हुसेन या तरुणाने सांगितले की, कुठलेही निर्बंध असल्याच आम्हाला आनंद आहे. कुठल्याही विशेष पासशिवाय प्रवेश देण्यात आला.

शहरामध्ये अनेश शाळा ध्वजारोहणासाठी सकाळी उघडण्यात आल्या. तर दुकानेसुद्धा उघडली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पुरेसे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

तसेच प्रदेशातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा यावेळीही अबाधित ठेवण्यात आली होती. याआधी येथील सेवा ह्या १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी बंद ठेवल्या जात असत.