Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:30 AM2022-05-26T10:30:30+5:302022-05-26T10:35:52+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील काही मोठ्या निर्णयांवर नजर टाकली, तर त्यात एक गोष्ट कॉमन असल्याचे आपल्या लक्षात येईल. ती म्हणजे 'आठ' हा अंक.

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा असो, या घोषणांची एकतर तारीख आठ आहे किंवा अंकांची बेरीज तरी आठ आहे. मोदीं यांची जन्म तारीखही 17 सप्टेंबर आहे. या अंकाची बेरीजही आठ येते.

पंतप्रधान मोदी यांचे मोठे निर्णय आणी अंक '8' - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसारख्या मोठा आणि धाडसी निर्णयाची घोषणा 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता केले होती. याशिवाय त्यांनी लॉकडाउनची घोषणा करतानाही रात्री आठ वाजताचीच वेळ निवडली होती.

विशेष म्हणजे, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी 26 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. याची बेरीजही 8 च होते. याशिवाय त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची घोषणाही 26 फेब्रुवारीलाच केली होती.

पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबरला चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी 26 मार्च रोजी प्रचाराला सुरुवात केली होती.

याशिवाय त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही 26 एप्रिल निवडली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या सुरुवातीची तारीखही 8 एप्रिलच निवडली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपल्या निर्णयांमुळे देशातील जनतेला नेहमीच आश्चर्यचकित केले आहे. यामुळे आज त्यांचे सरकार आठ वर्ष पूर्ण करत असताना, हा क्षण अविस्मरणीय बनविण्यासाठी त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या तर आश्चर्य वाटायला नको.

आपल्यला माहीतच आहे, की नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर कमी करून सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.