CoronaVirus लॉकडाऊनमध्ये रक्तदान करायचे आहे?; मग जाणून घ्या, कसा बनवतात ई-पास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:12 PM2020-05-11T15:12:25+5:302020-05-11T15:20:13+5:30

एप्रिल व मे महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे नियमित रक्तदाते कमी होतात साहजिकच रक्तसाठ्याचा तुटवडा भासतो.

रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत व गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त हेतूने सहकार्य करावे, असंही आवाहन केलं जातं.

लॉकडाऊनमुळे देशभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते जरी समोर आले असले तरी अटी अन् शर्थींमुळे त्यांना रक्तदान करता येत नाही.

लॉकडाऊनमुळे रक्त देण्याची इच्छा असणारे लोकांनाही रक्त दान करता येत नाही. विशेष म्हणजे बर्‍याच रुग्णालयात असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना सतत रक्ताची गरज असते.

जर कोणाला रक्तदान करण्याची इच्छा असेल तर त्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. केंद्र सरकारनं रक्तदात्यांना कशा पद्धतीनं ई-पास बनवता येईल, याची माहितीच उपलब्ध करून दिली आहे.

प्रथम आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर eraktkoshवर सर्च करा आणि https://www.eraktkosh.in/ वेबसाइट उघडा.

वेबसाइट उघडल्यानंतर खालच्या बाजूला उजवीकडे डोनेट नाऊ असं लिहिलेले दिसेल. त्याचप्रमाणे लाल रंगाच्या बॉक्समध्ये ई-पास लिहिलेलं असेल. त्यावर क्लिक करा किंवा टॅप करा.

एक नवीन पेज उघडेल. या पेजमध्ये रक्तदान करणार्‍यचे नाव / फोन नंबर इत्यादी महत्त्वाची माहिती भरावी लागेल.यानंतर पेजच्या तळाशी असलेल्या सेव्हवर क्लिक करा. आपण सेव्ह क्लिक करताच ई-पास तयार होईल.

जर आपण लखनऊमध्ये राहत असाल तर लॉकडाऊनमध्ये रुग्णालयात जाऊन आपण रक्तदान करू शकता. यासाठी घरबसल्या आपल्या मोबाइलवर ई-पास मिळेल. उत्तर प्रदेश सरकारने रक्त देण्यास इच्छुक असणा-यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला होता.

आपल्याला या हेल्पलाइन नंबरवर कॉल किंवा संदेश पाठवावा लागेल. यानंतर रक्तदानासाठी निश्चित केलेल्या तारखेचा पास व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला जाईल.

अधिक माहितीसाठी पीजीआय: 0522-2494505, 2494508, 2494500, केजीएमयू : 9415761773 (व्हॉट्सऍप) या नंबरवर संपर्क साधू शकता.

Read in English