लोकमत फोटो ऑफ दी वीक

By admin | Published: April 13, 2016 12:00 AM2016-04-13T00:00:00+5:302016-04-13T00:00:00+5:30

वैष्णवांची मांदियाळी - नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये दाखल झालेल्या लाखो भाविकांनी अथांग नाथसागरात पवित्र स्नान केले.

कानिफनाथांचा जयघोष - मढी (ता. पाथर्डी) येथील ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराज समाधी दिन सोहळ्यानिमित्त संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी गड फुलून गेला.

सोलापूरी फटका - उड्डाणपुलासह २७ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्वपूर्ण नेते सोलापूरात आले होते. सर्व नेत्यांनाच सोलापूरी तापमानाच चांगलाच फटका बसला.

कष्टक-यांची वाट - डोक्यावर केळीचा घड घेऊन कष्टकरी आई मुलासोबत चालली आहे. बाजाराच्या दिशेने जाणारा कष्टाचा हा रस्ता तुडवत जाणारे माय-लेक

पाण्यासाठी दाही दिशा - सातारा शहराजवळील उपनगरात पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे शाळकरी मुलांनाही रस्त्यांवरील वाहनांतून मार्ग काढत पाणी भरावे लागत आहे. तर दुसरीकडे शहरात कडाक्याचा उन्हाळा व पाणीकपात असतानाही वाहने धुण्यासाठी पाण्याचा वारेमाप वापर होत आहे.