कोल्हापुरात मर्दानी खेळ राज्यस्तरीय स्पर्धेस उत्साही सुरुवात; ३३ मर्दानी खेळाचे आखाडे सहभागी

By सचिन भोसले | Published: October 20, 2023 12:21 PM2023-10-20T12:21:27+5:302023-10-20T12:43:12+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत शुक्रवारपासून मर्दानी खेळाची राज्यस्तरीय स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, मुंबई, उत्तर कर्नाटकातील ३३ मर्दानी खेळाचे आखाडे सहभागी झाले आहेत. दोन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी सकाळी पहिल्या फेरीत स्पर्धकांनी एक हाती चक्र, कसरत उडी, भाला, दांडपट्यावरून उडी, आदी युद्धकला प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली. (सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)

एकहाती चक्र फिरवून उपस्थितांचे लक्ष वेधले.

लाठीकाठीच्यावरून उडी मारण्याची प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळवली.

दांडपट्ट्यावरून डोळ्याचे पाते लवते ना लवते अशा काही सेकंदात थरारक उड्या मारून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला

दांडपट्टा खेळत मारल्या थरारक उड्या

मुलीने तलवारबाजीची प्रात्याक्षिके सादर केली

एकहाती चक्र फिरवून उपस्थितांचे लक्ष वेधले