केवळ दिल्लीच नाही तर पाकिस्तानातही आहे लाल किल्ला, तयार व्हायला लागले होते ८७ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:21 PM2021-10-28T15:21:11+5:302021-10-28T15:29:52+5:30

Red Fort of Pakistan : किल्ल्याची वास्तुकला बघण्यासारखी आहे. हा किल्ला तीन दिशांनी नीलम नदीने वेढलेला आहे. उत्तर भागात पायऱ्यांजवळ एक छत बनवली आहे. या पायऱ्यांनी नदीच्या किनाऱ्यावर जाता येतं.

तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की, ऐतिहासिक लाल किल्ला किंवा रेड फोर्ट दिल्लीत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानमध्ये एका प्राचीन इमारत आहे ज्याला रेड फोर्ट म्हटलं जातं. तसा हा किस्सा भारताचा भाग राहिला असता, पण भारताची फाळणी झाल्यावर हा किल्ला पाकिस्तानात गेला. चला जाणून घेऊन या किल्ल्याचा इतिहास आणि काही न ऐकलेल्या गोष्टी...

पाकिस्तानचा लाल किल्ला देशाच्या मुजफ्फराबादमध्ये आहे. त्यामुळे याला मुजजफ्फराबादचा किल्ला किंवा मुजफ्फराबाद फोर्टच्या नावानेही ओळखलं जातं. त्यासोबतच या किल्ल्याला स्थानिक लोक रूट्टी किल्ला किंवा केवळ किला म्हणतात.

असं मानलं जातं की, या किल्ल्याचं निर्माण मुजफ्फराबाद शहराचे संस्थापक सुल्तान मुजफ्फर खानने केलं होतं. या किल्ल्याच्या निर्माणाचं काम १५५९ मध्ये सुरू झालं होतं. पण नंतर यावर मुघलांनी ताबा मिळवला होता. या किल्ल्याचं निर्माण फारच हळूवार सुरू होतं. १६४६ मध्ये हा किल्ला पूर्णपणे बनून तयार होता. डोगरा शासकांच्या काळात या किल्ल्यात अनेक बदल करण्यात आले.

किल्ल्याची वास्तुकला बघण्यासारखी आहे. हा किल्ला तीन दिशांनी नीलम नदीने वेढलेला आहे. उत्तर भागात पायऱ्यांजवळ एक छत बनवली आहे. या पायऱ्यांनी नदीच्या किनाऱ्यावर जाता येतं. हा किल्ला फारच सुरक्षित बनवण्यात आला होता. जेणेकरून पाण्यापासून किल्ल्याला वाचवता यावं. पण काळानुसार किल्ल्याचा बराच भाग ढासळला आहे.

किल्ल्याच्या पुर्ननिर्माणाचं काम १८४६ मध्ये डोगरा राजवंशाचे महाराज गुलाब सिंह यांनी केलं होतं. राजकीय आणि सैन्य अभियानासाठी किल्ल्याचा विस्तार करण्यात आला. तेच किल्ल्याचं पूर्ण काम महाराजा रणबीर सिंह यांच्या शासनकाळात पूर्ण झालं. डोगरा मिलिट्रीची नवीन छावणी तयार होईपर्यंत या किल्ल्याचा १९२६ पर्यंत वापर करण्यात आला. तेव्हापासून हा किल्ला रिकामा पडला आहे.

Read in English