चीनमध्ये हजारो मशिदी उद्ध्वस्त, शी जिनपिंग यांचा प्लॅन काय?; मुस्लीम देशही गप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:34 PM2023-11-22T19:34:43+5:302023-11-22T19:38:48+5:30

जगासमोर चांगुलपणाचा बुरखा पांघरलेल्या चीनच्या शी जिनपिंगच्या काळात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं समोर येत आहे. ह्यूमन राईट्स वॉचनं एक नवीन रिपोर्ट समोर आणला आहे. त्यामुळे चीनची ही करतूत बाहेर आली आहे.

शी जिनपिंग यांच्या नेतृत्वातील चीन सरकारकडून त्यांच्या देशातील हजारो मशिदी उद्ध्वस्त करत आहेत तर काहींच्या रचनेत बदल करत आहे. शिनजियांगसह चीनच्या उत्तर मध्य क्षेत्रातही मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात येतोय

निग्जिंया आणि गांसु परिसरात चीनकडून ही कारवाई सुरू आहे ज्याठिकाणी मुस्लीम समुदायाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अल्पसंख्यकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार धार्मिक स्थळांना लक्ष्य करत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार, आतापर्यंत हजारो मशिदी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. जर काही मशिदींच्या मूळ रचनेतच बदल केला जात आहे जेणेकरून त्या मशिदी दिसू नयेत. ह्यूमन राईट्सच्या संशोधकांनी निग्जिंयातील २ गावात मशिदीचा आढावा घेतल्यानंतर हा रिपोर्ट बनवला.

२०१९ ते २०२१ या काळात या भागातील सर्व ७ मशिदीवरून गुबंद आणि मीनार हटवण्याात आली. तर ३ मशिदी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. ४ मशिदीच्या मूळ रचना बदलण्यात आल्या. एकाचे स्नान कक्ष तोडण्यात आले

एकूण या भागातील २०२० नंतर आतापर्यंत १३०० मशिदी ज्या देशातील एक तितृयांश आहेत त्या बंद करण्यात आल्या. कदाचित या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. कारण उद्ध्वस्त झालेल्या आणि बंद असलेल्या मशिदींचा उल्लेख नाही. ज्यांच्यावर २०२० पूर्वी कारवाई करण्यात आली आहे.

ह्यूमन राईट्स वॉचचे कार्यवाहक माया वांग यांनी म्हटलं की, चीन सरकार मुस्लिमांवर अत्याचार करत नाही असा दावा केला जातो. परंतु इथं धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत अनेक मशिदी बंद केल्या. चीन सरकारचा मशिदी बंद करणे, उद्ध्वस्त करणे आणि त्यांची रचना बदलून इस्लामच्या चालरितींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून पाश्चिमात्य विशेषत: अमेरिका चीन सरकारवर सातत्याने शिनजियांग प्रातांत मुस्लीम लोकसंख्येवर अत्याचार करत असल्याचा आरोप करत आहे. मागील वर्षी संयुक्त राष्ट्र द्वारे एका रिपोर्टमध्येही चीनच्या कारवायांना मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटलं होते.

तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अनेकदा स्पष्ट केलंय की, चीनमध्ये इस्लाम केवळ त्याचवेळी अस्तित्वात राहू शकतो जेव्हा त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा केली जाईल.

दरम्यान, ह्यूमन राईट्स वॉचच्या या रिपोर्टनंतरही जगातील अनेक इस्लामिक देश यावर मौन बाळगून आहेत. त्याचसोबत स्वत:ला मुस्लिमांचा मसीहा म्हणवणाऱ्या पाकिस्ताननेही यावर गप्प राहणे पसंत केले आहे.