Russia Ukraine War: युद्ध थांबता थांबेना! बॉम्बस्फोट,तोफा-गोळ्यांच्या वर्षावात युक्रेनियन जनता जगतेय असं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 04:59 PM2022-03-12T16:59:47+5:302022-03-12T17:04:45+5:30

Russia Ukraine War: गेल्या पंधरवड्यापासून युक्रेनमध्ये रशियाकडून भयानक हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये होत असलेल्या नुकसानाचे शेकडो फोटो समोर येत आहे. जिथे काही दिवसांपूर्वीपर्यंत घरे, बाजार होते तिथे आता केवळ ढिगारे उरले आहेत.

गेल्या पंधरवड्यापासून युक्रेनमध्ये रशियाकडून भयानक हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये होत असलेल्या नुकसानाचे शेकडो फोटो समोर येत आहे. जिथे काही दिवसांपूर्वीपर्यंत घरे, बाजार होते तिथे आता केवळ ढिगारे उरले आहेत.

८ मार्चला घेण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये खारकिव्ह येथील एक उद्ध्वस्त इमारत दिसत आहे. त्यात जिथे ढिगारे दिसत आहेत. निरखून पाहिलं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत तिथे एक खेळाचे मैदान होते. सध्या युक्रेनमध्ये युद्धामुळे तब्बल १० लाख मुले निर्वासित झाली आहेत.

रशियाने युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमधील लाखो नागरिक युक्रेनविरोधात सैनिकांसोबत लढत आहेत. ४ मार्च रोजी पश्चिम किव्हमधील मोलोतोव्हमध्ये एक महिला कॉकटेल तयार करताना दिसत आहेत. येथे चेकपोस्ट तयार करणे, खंदक खोदणे, टायर जमा करणे, त्यामध्ये पुस्तके ठेवणे, वेळप्रसंगी ते टायर पेटवून रशियन सैनिकांची दिशाभूल करणे, अशी कामं नागरिक करत आहेत. तसेच किव्हला घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या रशियन सैन्याच्या ताफ्याला रोखण्यासाठी किव्हमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून नागरिकांची हिंमत वाढवत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागत आहेत.

दरम्यान, युक्रेनमध्ये नागरिकांना युद्ध लढण्यासाठी तातडीने ट्रेनिंग दिली जात आहे. तसेच रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी लोकांची संख्या कमी नाही आहे. हा फोटो राजधानी किव्हमधील पश्चिमेस असलेल्या जेटोमेयर येथील आहे.

९ मार्च रोजी मारियोपोल येथील एका मॅटर्निटी रुग्णालयावर हल्ला झाला. या फोटोमध्ये एक महिला नुकसानग्रस्त इमारतीच्या बाहेर आपले सामान घेऊन उभी आहे. गेल्या १२ दिवसांपासून रशियाने घेराव घातलेला असून, गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जीव वाचवण्यासाठी धावपळ हा फोटो युक्रेनमधील ओडेसा येथील आहे. २७ वर्षांचा व्हिक्टर आनातोलेविच आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन अंडरग्राऊंड शेल्टरमध्ये जात आहेत. जेव्हा हल्ला करण्यासाठी रशियन विमाने येतात तेव्हा हल्ल्याचा इशारा देण्यासाठी सायरन वाजतो. मग लोक शेल्टरमध्ये धाव घेतात.

हा फोटो मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यातील आहे. यामध्ये किव्ह सेंट्रल स्टेशनवर ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. २४ फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे २५ लाख लोक निर्वासित झाले आहेत.