Chinese Navy News: चीननं जगाचं टेन्शन वाढवलं! शत्रू देशात त्सुनामी निर्माण करणारं अण्वस्त्रं बनवलं, एक डागलं की खेळ खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:43 PM2022-07-30T23:43:47+5:302022-07-30T23:49:00+5:30

Chinese Navy News: चीन नेहमीच आपल्या शस्त्र साठ्यात घातक शस्त्र कशी दाखल करता येतील यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. आता एक नवं शस्त्र चीननं शोधून काढलं आहे आणि यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.

अमेरिकेसोबतच्या स्पर्धेत दक्षिण चीनी समुद्रात आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी चीननं आता डिस्पोजेबल अण्वस्त्र रिअॅक्टर बनवण्यास सुरुवात केली आहे. हे मिसाइल लांब पल्ल्याचे टॉर्पेडो (पाणसुरुंग, पाणतीर) असणार आहे.

चीन तयार करत असलेल्या या टॉर्पेडोच्या माध्यमातून चिनी नौदल समुद्राखाली आण्विक त्सुनामी निर्माण करू शकतो. चिनी संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या एका संशोधन पथकानं लहान, कमी किमतीच्या अण्वस्त्र रिअॅक्टरसाठी संकल्पनात्मक डिझाइन पूर्ण केले आहे.

चीनचे संशोधक याद्वारे रशियन पोसीडॉन मानवरहित पाणबुडीचे मिनी व्हर्जन तयार करण्याच्या तयारीत आहेत. पोसीडॉन हे जगातील पहिले ज्ञात अणुऊर्जेवर चालणारे वॉटर ड्रोन आहे. हे रशियन ड्रोन जगातील सर्वात मोठी पाणबुडी बेल्गोरोडमध्ये तैनात करण्यात आले आहे. हे शस्त्र कोणत्याही देशाच्या किनारपट्टीवर आण्विक सुनामी आणू शकते.

चीनी संशोधकाच्या म्हणण्यानुसार पोसीडॉनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं शक्य नाही. कारण ते एक अत्यंत महागडं आणि विनाशकारी प्रमाण आहे. पण नवीन 'डिस्पोजेबल' आण्विक रिअॅक्टर प्रमाणित टॉर्पेडो ट्यूबमध्ये बसविली जाऊ शकते.

टॉर्पेडो डिस्पोजेबल आण्विक अणुभट्टीतून धडकण्यापूर्वी 200 तासांपर्यंत 30 नॉट्स (56 किमी/ता किंवा 35 मैल प्रतितास) पेक्षा जास्त वेगाने मारा करू शकते. इतकंच नाही तर हल्ला करण्यापूर्वी ते आण्विक मिसाइल समुद्रातच टाकेल आणि नंतर वॉरहेडने लक्ष्याचा वेध घेऊ शकेल.

चायना इन्स्टिट्यूट ऑफ अॅटोमिक एनर्जीचे मुख्य शास्त्रज्ञ गुओ जियान यांनी डिस्पोजेबल आण्विक रिअॅक्टर आणि रशियाच्या पोसेडॉनमध्ये मूलभूत फरक काय आहे तो समजावून सांगितलं. चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशनच्या पीअर-रिव्ह्यूड जर्नल ऑफ अनमान्ड अंडरसी सिस्टम्समध्ये या महिन्यात प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये गुओ जियान म्हणाले की ही हाय फ्लेक्जिबिलिटी आणि कमी खर्चीक रिअॅक्टर आहे. अणुऊर्जेवर चालणारे आणि मानवरहित असल्याने त्यांचा वापर पाणबुडी म्हणूनही करता येतो.

रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोसेडॉन दोन मेगाटन न्यूक्लियर वॉरहेडने हल्ला करू शकतो. त्याच्या हल्ल्यामुळे किनारपट्टीवरील कोणत्याही शहरात आण्विक त्सुनामी येऊ शकते. पोसायडॉनचा हल्ला हिरोशिमावरील अणुहल्ल्यापेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असेल. परंतु चिनी संशोधकांनी सांगितले की पोसेडॉन सारख्या शस्त्राचा वापर केल्याने जागतिक स्तरावर अणुयुद्ध सुरू होऊ शकते. या कारणास्तव, हे शस्त्र कधी वापरले जाण्याची शक्यता कमी आहे.

चीनमध्ये लहान, हायस्पीड, लांब पल्ल्याच्या अंडरवॉटर ड्रोनची मागणी वाढत असल्याचं गुओ जियान यांचं म्हणणं आहे. यांचा उपयोग ट्रॅकिंग, हल्ला आणि धोरणात्मक स्ट्राइकमध्ये केला जाऊ शकतो.

त्यामुळे अशा प्रकारे डिस्पोजेबल आण्विक रिअॅक्टर मोहिमांना समर्थन देण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला जाऊ शकतो. पण बहुतेक रिअॅक्टर एक अत्याधुनिक संरचना असून त्यासाठी प्रचंड खर्च येतो.