'पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, नैसर्गिक आपत्ती, कॅन्सरवर इलाज अन्...; 2024 साठी बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:17 PM2023-11-05T13:17:00+5:302023-11-05T13:35:54+5:30

2024 मध्ये जगाला मिळणार मोठी खुशखबरी...!

बाबा वेंगा यांच्या 2024 साठीच्या भविष्यवाणीची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. यात त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, कँसर आणि अल्झायमरवर इलाज, युरोपात दहशतवादी हल्ले आणि पृथ्वीची कक्षा बदलण्या समावेश आहे. महत्वाचे म्हणजे बाबा वेंगा यांची अधिकांश भाकितं सत्य सिद्ध झाली आहेत. बाबा वेंगा यांनी यूक्रेन वरील हल्ल्यासंदर्भातही भविष्यवाणी केली होती.

बाबा वेंगा यांना बाल्कनमधील नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखले जाते. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचा मृत्यू 26 वर्षांपूर्वी वयाच्या 84 व्या वर्षी झाला होता. मात्र त्यांची भाकितं आजही सत्य ठरत आहेत. तर जाणून घेऊयात 2024 संदर्भातील त्यांच्या भविष्यवाणी संदर्भात...

बाबा वेंगा यांच्या 2024 मधील भाकितांपैकी एक भाकीत पृथ्वीच्या कक्षेतील बदलासंदर्भातही आहे. याच अर्थ, आपल्याला पूर अथवा पुढील हिमयुगाचा सामना करावा लागू शकतो. मात्र, सूर्यापासून पृथ्वी किती अंतरावर असणार? यावर हे अवलंबून असेल.

पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न - डेली स्टारच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भात जी सर्वात मोठी भविष्यवाणी केली होती, ती जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांपैकी एक असलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासंदर्भात होती. वेंगा यांच्यामते, रशियन राष्ट्रपतींना त्यांच्याच देशातील एखाद्या व्यक्तीकडून मारण्याची योजना आखली जाईल.

युरोपवर दहशतवादी हल्ले वाढतील - बाबा वेंगा यांनी घातक शस्त्रांस्त्रांसंदर्भात भविष्यवाणी केली होती. त्यांचा दावा आहे की, एक मोठा देश पुढील वर्षात जैविक शस्त्रांची चाचणी अथवा हल्ला करेल. एवढेच नाही दर दहशतवाद्यांचे युरोपवरील हल्ले वाढतील, अशी भविष्यवाणीही वेंगा यांनी केली आहे.

भयंकर नैसर्गिक आपत्ती - बाबा वेंगा यांनी 2024 साठीच्या आपल्या भविष्यवाणीत, पृथ्वीच्या कक्षेत बदल होऊ शकतो, असेही म्हटले आहे. सर्वसाधारणपणे असा बदल दीर्घ काळानंतर होत असतो. मात्र हे लवकर घडले, तर आपल्याला, भयंकर नैसर्गिक आपत्ती आणि किरणोत्सर्गाच्या पातळीत वाढ देखील दिसू शकते.

कॅन्सरवर नवा इलाज - सर्वात महत्वाचे म्हणजे, बाबा वेंगा यांनी एक अशी भविष्यवाणी केली आहे, जी वैद्यकीय क्षेत्रात सर्वश्रेष्ठ सिद्ध होऊ शते. वेंगा यांनी दावा केला आहे की, 2024 मध्ये अल्झायमर आणि कॅन्सरसह अनेक असाध्य आजारांवर नवे उपचार शोधले जातील.