CoronaVirus News : भयंकर! कोरोनाचा खतरनाक परिणाम; मेंदूत दिसताहेत भीतीदायक संकेत, रिसर्चमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:54 PM2022-03-08T12:54:24+5:302022-03-08T13:08:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना कधी संपेल हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही पण त्याचे घातक परिणाम नेहमीच समोर येत असतात.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ओमायक्रॉनसारख्या कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटने तर आणखी चिंता वाढवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,993 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 108 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

भारतात सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे. पण अनेक देशांमध्ये त्याचा वेग वाढू लागला आहे. यासोबतच जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

कोरोना कधी संपेल हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही पण त्याचे घातक परिणाम नेहमीच समोर येत असतात. कोरोना नंतरच्या परिस्थितीवर जगभरात संशोधन केले जात आहे. त्यांचे निकालही धक्कादायक आहेत.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिसर्चनुसार, कोरोनाग्रस्त लोकांचा मेंदू आकुंचित म्हणजे छोटा होऊ लागला आहे. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.

शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मेंदूचा पहिला एमआरआय आणि कोरोना झाल्यानंतरच्या एमआरआयमध्ये मोठा फरक आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती, त्यांच्या मेंदूचा आकारही हळूहळू कमी होऊ लागला आहे.

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे मेंदूचा आकार लहान होत असल्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर कमी होत आहे. ग्रे मॅटरमुळे माणसाची स्मरणशक्ती तयार होते. हे गंध ओळखण्याशी देखील थेट संबंधित आहे.

कोरोनानंतर मेंदूमध्ये झालेला हा बदल कायमस्वरूपी आहे की नाही हे अद्याप संशोधकांना माहीत नसले तरी मेंदू स्वतःला बरा करण्यात पटाईत आहे यावर त्यांनी भर दिला. यावर दीर्घकाळ संशोधन झाल्यावरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

कोरोनाबाबतचा हा रिसर्च नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वेलकम सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह न्यूरोइमेजिंगचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक ग्वेनेल डौड यांनी सांगितले की, सध्या संशोधनात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या मेंदूची चाचणी घेण्यात आली.

आजारापूर्वी आणि कोरोनानंतर मेंदूमध्ये किती बदल झाला हे आम्हाला पाहायचे होते. हा निकाल धक्कादायक होता. यूकेच्या बायोबँक प्रकल्पांतर्गत गेल्या 15 वर्षांपासून 5 लाख लोकांच्या आरोग्याबाबत डेटाबेस तयार केला जात आहे.

ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्या आधीच्या एमआरआय आणि आताच्या एमआरआयची तुलना केली जात आहे. अभ्यासात, कोरोनानंतर 4.1 महिन्यांनंतर सरासरी 401 लोकांचा एमआरआय करण्यात आलीा

रिसर्चमध्ये 384 लोकांचा देखील समावेश करण्यात आला होता ज्यांना कोरोना नाही पण त्यांचा आधी एमआरआय झाला होता. या दोन्ही गटातील लोकांचा नंतर एमआरआय करण्यात आला आहे.

एमआरआय विश्लेषणात असे दिसून आले की ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती, त्यांचा मेंदू 0.2 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर आला होता. याशिवाय ग्रे मॅटरही कमी झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात आर्द्रता वाढल्याने व्हायरस आणखी पसरणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे.

महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. टास्क फोर्सचे डॉ.शशांक जोशी आणि डॉ.राहुल पंडित यांनी तसे संकेत दिले आहेत.

डॉ. शशांक जोशी यांच्या मते, पाश्चात्य देशांमध्ये थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होतो, तर भारतात उन्हाळ्यामध्ये. हाच ट्रेंड पहिल्या दोन लहरींमध्ये दिसून आला आहे. ते म्हणाले की, उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता वाढली की व्हायरस वाढतात असे निदर्शनास आले आहे.