CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:37 AM2022-02-23T08:37:58+5:302022-02-23T08:56:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

जगातील सर्वच देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. या व्हेरिएंटने ज्यांना यापूर्वी कोविड झाला होता किंवा ज्यांनी लस घेतली आहे. त्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

कोरोनाची ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर आता भीती आणखी वाढली आहे की कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट किंवा भविष्यात येणारे अन्य व्हेरिएंट लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे, विशेषत: जे लोक पूर्वी कोविड झाले आहेत ते सहजपणे पुन्हा संसर्गाचे बळी होऊ शकतात. तथापि, याबद्दल फार मर्यादित माहिती आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. मनोज गोयल यांनी कोविडचा पुन्हा संसर्ग होणे अशा प्रकारे परिभाषित केले जाऊ शकते की ज्या व्यक्तीला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती ती पुन्हा संसर्गाची शिकार होते.

सौम्य लक्षणांमुळे, पुन्हा संसर्गाची प्रकरणे ओळखणं थोडं कठीण आहे कारण त्या व्यक्तीची कोविड चाचणी होत नाही. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्गाची अनेक प्रकरणे ही समोर आली आहेत.

कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळा डेटा समोर आणला आहेत. ऑक्‍टोबर 2021 मधील एका रिसर्चनुसार, COVID-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सुमारे 3 महिने ते 5 वर्षे टिकू शकते.

दुसऱ्या एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की रोग प्रतिकारशक्ती तब्बल 8 महिने टिकून राहू शकते. म्हणजेच हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते.

COVID-19 संसर्गाची लागण झाल्यानंतर बरे झालेले लोक. त्यांच्यामध्ये SARs-COV-2 व्हायरसविरूद्ध विशिष्ट स्तरावरील प्रतिकारशक्तीची अपेक्षा केली जाऊ शकते. याचा अर्थ ते वारंवार होणाऱ्या संसर्गापासून सुरक्षित राहतात.

कोरोनाच्या महाभयंकर संकटात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी केले आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ हे ठरवू शकत नाहीत की नैसर्गिक संसर्ग किंवा लस यापासून किती काळ प्रतिकारशक्ती प्रभावी राहते.

नैसर्गिक प्रतिकारशक्तीचा कालावधी निश्चितपणे ज्ञात नाही. डॉ. गोयल यांनी 3 ते 12 महिने टिकू शकते. संरक्षणात्मक अँटीबॉडीज आणि टी पेशींच्या पातळीत घट झाल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कालांतराने हळूहळू कमी होत असल्याचं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी, कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. डॉ गोयल यांच्या मते, जी व्यक्ती कोरोना नियमावलीचे पालन करत नाही, ज्याला वेळेवर लसीकरण झाले नाही, त्यांना धोका आहे.

वृद्ध लोक, मधुमेहाचे रुग्ण, हृदय, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करणे आणि लसीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.