श्वास घेताना छातीत वेदना म्हणजे या 5 आजारांचा धोका, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:19 PM2023-09-25T14:19:40+5:302023-09-25T14:37:49+5:30

Foods For Lung Health: ही समस्या फुप्फुसांच्या 5 आजारांकडेही इशारा करते. हे इशारे वेळीच ओळखून फुप्फुसांना हेल्दी ठेवलं जाऊ शकतं.

Foods For Lung Health: छातीत वेदना होणं हे केवळ हार्ट अटॅक किंवा गॅसमुळे होत नाही. ही समस्या फुप्फुसांच्या 5 आजारांकडेही इशारा करते. हे इशारे वेळीच ओळखून फुप्फुसांना हेल्दी ठेवलं जाऊ शकतं.

छातीत रूतण्याचं कारण- कधी कधी छातीमध्ये वेदना होणं किंवा टोचल्यासारखं वाटणं कॉमन आहे. काही लोकांना ही गॅस बनण्याची लक्षणं वाटतात तर काही लोकांना हार्ट अटॅकचे संकेत मानतात. पण ही समस्या फुप्फुसांसंबंधी असू शकते. छातीत वेदना किंवा टोचल्यासारखं वाटत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा. कारण यामागे फुप्फुसांचे 5 गंभीर आजार असू शकतात.

निमोनिया - दरवर्षी हजारो लोकांना निमोनिया होतो. हे एक घातक इन्फेक्शन आहे. ज्यामुळे श्वास घेण्यादरम्यान छातीतमध्ये वेदना होतात. अमेरिकन लंग्स असोसिएशननुसार, खोकला किंवा श्वास घेताना वेदना जास्त होतात.

फुप्फुसात रक्ताची गाठ - छातीमध्ये वेदना होण्याचं कारण पल्मोनरी एम्बोलिज्मही असू शकतो. या आजारात फुप्फुसाच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. ज्यामुळे टिश्यूमध्ये पोहोचणारा रक्तप्रवाह स्लो होतो.

फुप्फुसात समस्या - या समस्येला कोलॅप्स्ड लंग्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अचानक सुरू होते. या आजारात फुप्फुसं आणि पासोळ्यांमधून हवा लीक होऊ लागते. ज्यामुळे वेदना होण्यासोबत श्वासही भरून येतो.

लंग्समध्ये इन्फ्लामेशन असणं - वेगवेगळे बॅक्टेरिया आणि व्हायरस फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन निर्माण करू शकतात. हळूहळू यामुळे लंग्स मेंब्रेनमध्ये इन्फ्लामेश येते आणि श्वास घेताना किंवा खोकला आला तर वेदना जाणवतात.

फुप्फुसात हाय ब्लड प्रेशर - हाय ब्लड प्रेशर हृदय आणि मेंदुसोबत फुप्फुसांनाही प्रभावित करतं. जेव्हा ब्लड प्रेशर नॉर्मल लेव्हलपेक्षा वर जातं तेव्हा छातीत वेदना होतात. या समस्येला पल्मोनरी हायपरटेंशन म्हटलं जातं.

फुप्फुसं हेल्दी ठेवण्याचे उपाय - जर तुम्हाला फुप्फुसं हेल्दी ठेवायचे असतील तर अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी इंफ्लामेटरी फूड्सचं सेवन करा. याने तुमची फुप्फुसं हेल्दी राहतात. बेरीज, ग्रीन टी, हळद, आलं इत्यादी फूड्स चांगले उदाहरण आहे.