Shocking! बॉयफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवण्यास अडचण ठरत होती मुलगी, आईने केली हत्या अ्न मिळाली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:53 PM2021-08-07T18:53:34+5:302021-08-07T19:08:43+5:30

कोर्टाकडून सांगण्यात आलं की, 'तुम्ही तिची कोणतीही मदत केली नाही. एका कॉलने मुलगी कायलीचा जीव वाचवला जाऊ शकत होता.

लहान मुले आपल्या आईच्या जास्त जवळ असतात. कारण तिच त्यांना जन्म देत असते. पण ब्रिटनच्या एका महिलेने बॉयफ्रेन्डसोबत संबंध ठेवण्यासाठी आपल्याच तीन वर्षाच्या मुलीची हत्या केली. आता मुलीच्या हत्येच्या आरोपात आईला १५ वर्षांची आणि तिच्या बॉयफ्रेन्डला १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या ९ ऑगस्टला कायली-जायदे प्रीस्ट नावाची तीन वर्षांची मुलगी फ्लॅटमध्ये मृत आढळून आली होती. तिच्या छातीवर आणि पोटावर जखमांचे निशाण होते.

मुलीच्या आईने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली होती. जेव्हा अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली तर यात मुलीच्या आईचाच हात असल्याचं समोर आलं.

कोर्टाने याप्रकरणी मुलीच्या आईला आणि तिच्या २२ वर्षीय बॉयफ्रेन्डला दोषी ठरवलं आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्या मुलीची हत्या केली कारण तिला जेव्हा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवायचे होते तेव्हा मुलगी अडचण ठरत होती.

मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर आईला १५ वर्षाची आणि बाल क्रूरतेसाठी तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्या दोन्ही शिक्षा एकत्र असतील.

दोघांनाही शिक्षा सुनावताना जस्टिस फॉक्सटन क्यूसी म्हणाले की, '८ ऑगस्ट सायंकाळी तुम्ही रेडफर्न प्रीस्टच्या फ्लॅटमध्ये गेल्या. तुम्ही दोघे तिथे संबंध ठेवण्यासाठी गेले होते. पण मुलगी कायलीला उठून खेळायचं होतं. पुढे काय झालं त्याचा प्रत्यक्ष काही पुरावा नाही'.

ते म्हणाले की, 'कायली रात्री एकापेक्षा जास्त वेळ मारल्याने आजारी पडली होती. तुमचा तुमच्यावर कंट्रोल नव्हता आणि हे स्पष्ट आहे की, या हल्ल्यात तुम्ही सारखे भागीदार आहात. तुम्हाला दोघांनाही माहीत होतं की, मारहाण करून कायलीला तुम्ही गंभीर जखमी केलं आहे'.

कोर्टाकडून सांगण्यात आलं की, 'तुम्ही तिची कोणतीही मदत केली नाही. एका कॉलने मुलगी कायलीचा जीव वाचवला जाऊ शकत होता. चौकशीदरम्यान तुम्ही दोघे पुन्हा पुन्हा खोटे बोलले. मुलीला गंभीर मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला'.

मृत कायली जायदे प्रीस्टच्या मृत्यूच्य अंतिम क्षणांचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमधून झाला होता. कोर्टात दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये कायली जायदे आणि तिच्या आईला सोलिहुलच्या किंग्सहर्स्ट हाउलच्या फ्लॅटमध्ये लिफ्टचा वापर करताना बघण्यात आलं.

Read in English