Gadchiroli Naxal Encounter: 8.30 तास मृत्यूशी झुंज! डोक्यातून रक्त वाहत होते, गुडघा जायबंदी, तरीही लढत राहिले नक्षवाद्यांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:26 PM2021-11-16T12:26:54+5:302021-11-16T12:33:35+5:30

Gadchiroli Naxal Encounter Story: ही चकमक एखाद्या युद्धाच्या सिनेमापेक्षा कमी नव्हती. रियल लाईफचे युद्धच होते. जखमी झाले तरी दुसरे सहकारी कमांडो मदतीला येऊ शकले नाहीत.

या टीममध्ये अत्यंत अनुभवी आणि एकसो एक धाडसी कमांडो होते. आदिवासी आणि अनुभवी पोलीस अधिकारी यांचा भरणा होता. मुंबईच्या अंडरवर्ल्डला हादरवून सोडणारे तसेच 56 एन्काऊंटरचा अनुभव गाठीशी असलेले 42 वर्षीय रवींद्र नैतम यांनी 2006 पासून आजवर 75 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारण्याच्या ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. शनिवारी गडचिरोलीतील चकमकीत ते जखमी झाले.

गडचिरोलीच्या सी-60 कमांडो युनिटचे ते सदस्य आहेत. नक्षल्यांनी त्यांच्या दिशेने डागलेली गोळी रवींद्र यांच्या डोक्याला घासून गेली. त्यांच्या डोळ्यासमोरून मृत्यू गेला. परंतू त्यांनी हिंमत सोडली नाही. तशाच जखमी अवस्थेत ते दहा तास लढत राहिले.

कमांडो रवींद्र नागपुरच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. त्यांनी डोक्यातून निघत असलेल्या रक्ताला रोखण्यासाठी एक टॉवेल कसकरून बांधले. यानंतर पुढील दहा तास ते उपचारासाठी वाट पाहत राहिले. या काळात ते वेदनेने विव्हळत होते. परंतू हिंमत हरले नाहीत.

रवींद्र यांचे सहकारी सर्वेश्वर अतराम हे एका दगडावर आदळले. त्यानंतर ते थेट 10 फूट खोल दरीत कोसळले. यावेळी त्यांच्या गुडघ्याला मार लागला. अतराम यांनी देखील विविध कारवायांमध्ये भाग घेतला होता. या मोहिमांमध्ये गेल्या काही वर्षांत 70 ते 75 नक्षलवादी मारले गेले आहेत.

शनिवारी चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले होते. ही संख्या मोठी होती. अतराम यांनी माओवाद्यांना दूर ठेवण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3.30 पर्यंत प्रयत्न केले. जेव्हा जगण्या मरण्याचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा वेदनांची जाणीव कमी होते. जर मी वेदनेचा विचार केला असता तर कारवाई करू शकलो नसतो. मरण तर एक दिवस येणारच आहे. मी गुडघ्याला औषध लावले आणि 9-10 तास चालत राहिलो, असे अतराम म्हणाले.

नेतम यांनी सांगितले की, गोळी लागल्यानंतर ते जवळजवळ बेशुद्धच झाले होते. माझ्या डोक्यातून रक्त वाहत होते. माझ्या साथीदारांकडे अँटी क्लॉटिंग किट होते. परंतू ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. कारण फायरिंग सोडली असती तर नक्षलवादी आमच्यावर हल्ला करू शकले असते. ती एक महत्वाची वेळ होती. मी ओरडूही शकत नव्हतो.