Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:16 PM2022-02-16T20:16:07+5:302022-02-16T20:23:51+5:30

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सायबर हॅकिंगचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृतीच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत.

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून किंवा पैशांचे आमिष दाखवून फोनकॉलद्वारेच लूट केली जाते.

देशात कोरोनाचे 2 डोस घेतलेल्या नागिरकांना आता बुस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र, या बुस्टर डोसच्या नावाने फोन करुन नागरिकांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सायबर हॅकिंगचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृतीच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत.

लसीकरणाच्या नावावर फसवणुकीच्या या नवीन प्रकारात हॅकर कॉल करीत फोनवरील व्यक्तीस त्याच्या लसीकरणाची अचूक तारीख सांगून बूस्टर डोससाठी विनंती करीत डोस नोंदणीच्या नावावर ओटीपी पाठविला जातो.

तो ओटीपी विचारतो. ओटीपी दिल्यानंतर संबंधितांचे बँक खाते हॅक करीत रक्कम काढून घेतो. म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे

बूस्टर डोससाठी मोबाइलवर येणारे कॉल फसवे आहेत. तुम्हाला कोणी डोससाठी विनंती करीत असेल अथवा ओटीपी पाठविला असेल, तर त्याला प्रतिसाद देऊ नका.

हा हॅकिंगचा नवीन फंडा आहे. शहरासह ग्रामीण भागात स्थानिक पोलिसांना अशा प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी सतर्क राहावे. पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.

नागरिकांनी बुस्टर डोसच्या नादात काळजी घ्यावी, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते