टॉप ६ JOB! ज्यानं घरबसल्याही महिन्याला कमावू शकता ५० हजारांहून अधिक सॅलरी, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:47 PM2023-05-29T12:47:10+5:302023-05-29T12:50:12+5:30

सध्याच्या स्पर्धात्मक युगात जॉब शोधणे कठीण झाले आहे. परंतु तुमच्याकडे स्कील असेल तर कमाईची चिंता नाही. तुम्ही JOB च्या शोधात असाल तर तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग क्षेत्र उत्तम पर्याय आहे. या क्षेत्रातील टॉप ६ नोकऱ्यांबाबत आपण माहिती घेऊया.

रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना डिजिटल मार्केटिंग कोर्समुळे चांगली कमाई होऊ शकते.अनेक कंपन्या डिजिटल मार्केटिंग करणाऱ्यांना हायर करते. डिजिटल क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या तरूणांना महिन्याला ५० हजारांहून अधिक सॅलरी सहज मिळते.

१. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर - डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून तुमच्यावर कंपनीच्या एकूण ऑनलाईन मार्केटिंग धोरणावर देखरेख करण्याची जबाबदारी असते. नियोजन करणे, डिजिटल कॅम्पेन, विक्रेत्यांची टीम व्यवस्थापित करणे यासारख्या जबाबदारी पार पाडावी लागते.

२. सीनिअर SEO तज्ज्ञ - सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन(SEO) तज्ज्ञ वेबसाइटवर ट्रॅफिक वाढवण्याच्या आणि सर्च इंजिनमध्ये रॅकिंग सुधारण्याचा प्रयत्न करतो. या तज्ञांना जास्त मागणी आहे. SEO तज्ज्ञ वेबसाइट्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी, कंटेट धोरणे तयार करण्यासाठी आणि ऑनलाइन सक्रियता वाढवण्यासाठी डेटाचे विश्लेषण करतात. योग्य कौशल्ये आणि अनुभवासह एक वरिष्ठ SEO तज्ज्ञ दरमहा ५० हजाराहून जास्त पगार मिळवू शकतो.

३. PPC तज्ज्ञ - पे-पर-क्लिक (PPC) तज्ज्ञ Google, Yahoo, Bing सारख्या सर्च इंजिन आणि Facebook, Instagram सारख्या सोशल मीडिया चॅनेलवरील जाहिरातींसह विविध प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन जाहिराती व्यवस्थापित करतात. ते जाहिराती तयार करून टार्गेट प्रेक्षकांना लक्ष्य करतात. त्यांचे काम पीपीसीच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे तसेच कंपनीसाठी गुंतवणुकीचा परतावा वाढवणे हे आहे. PPC तज्ञांचा प्रारंभिक पगार दरमहा ३५-४० हजार रुपये असला तरी अनुभव आणि कौशल्य प्राप्त केल्यानंतर ते दरमहा ५०-५५ हजार रुपये कमवू शकतात.

४. सोशल मीडिया मॅनेजर - सोशल मीडिया मॅनेजरना सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आखावी लागते आणि त्याची अंमलबजावणी करणे, आकर्षक डिझाईन्स तयार करणे, सोशल मीडिया खाती व्यवस्थापित करणे आणि ऑनलाइन फिडबॅकचे निरीक्षण करणे हे काम दिले जाते.

मार्केटिंगमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व वाढत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला पगार मिळत आहे. फेसबुक, इन्स्टा, ट्विटर यांसारख्या सोशल साइट्सवर कोणता कंटेंट जाईल, कंपनीमध्ये कोणते ग्राफिक्स जातील, कॅम्पेन कसे चालवले जातील आदींची जबाबदारी तुम्ही सांभाळली तर आजच्या काळात कंपन्या सोशल मीडिया मॅनेजरला ४० हजार पगारावर नियुक्त करतात. अनुभव असेल तर ५० हजारांहून अधिक कमाई होते.

५. कंटेट मार्केटिंग मॅनेजर - कंटेट मार्केटिंग मॅनेजरचे लक्ष टार्गेट प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि व्यस्त ठेवण्यासाठी लेख लिहिणे, मजकूर बनवणे. संपादकीय कॅलेंडर व्यवस्थापित करतात, लेखकांसह सुसंवाद साधत योग्य लेखसंग्रह बनवणे त्याचे विश्लेषण करणे ही कामे करतात.

डिजिटल माध्यमातील कंपन्यांमधील कंटेटची वाढती स्पर्धा पाहता, आजच्या काळात कंटेंट मार्केटिंगवर मजबूत पकड असलेल्या तरुणांना आकर्षक पगारावर नियुक्त केले जात आहे. कंटेंट मार्केटिंग मॅनेजरना कंपन्या ६-७ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकऱ्या दिल्या जातात.

६. ई-कॉमर्स विशेषज्ञ - ई-कॉमर्स विशेषज्ञ ऑनलाइन विक्री वाढवण्यावर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षिक करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते उत्पादन सूची बनवतात. विक्री डेटाचे विश्लेषण करतात. ई-कॉमर्स तज्ज्ञ त्यांच्या अनुभव आणि कौशल्याच्या आधारावर मासिक ५० हजार किंवा त्याहून अधिक पगार मिळवू शकतात.