साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना लाभ, गुंतवणुकीत फायदा; नोकरीची नवी ऑफर, मकरसंक्रांती शुभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 07:07 AM2024-01-14T07:07:07+5:302024-01-14T07:07:07+5:30

Weekly Horoscope: १४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२४ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात १४ तारखेला रवी मकरेत, तर १८ रोजी शुक्र धनुत जाईल. सद्य ग्रहस्थिती अशी की - गुरु आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, शुक्र वृश्चिकेत असून, १८ रोजी झनुत जाईल. जेथे त्याची युती मंगळ आणि बुध यांच्याशी होईल. रवी आणि प्लुटो मकरेत, शनी कुंभेत, राहु आणि नेपच्युन मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून होईल. रविवारी विनायकी चतुर्थी, भोगी आहे. धनुर्मास समाप्ती, १५ तारखेला मकरसंक्रांती आहे. पुण्यकाल सकाळी ०७ वाजून १७ मिनिटे ते सायंकाळी ०६ वाजून २० मिनिटे. १६ तारखेला किंक्रांत आहे. १८ तारखेला दुर्गाष्टमी असून, शाकंभरीदेवी नवरात्रारंभ आहे.

एकूण ग्रहस्थिती पाहता हा मकरसंक्रांतीचा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? सूर्याचे आणि शुक्राचे होत असलेले राशीपरिवर्तन कोणत्या राशींना अनुकूल ठरू शकेल? आर्थिक आघाडी, आरोग्य, शिक्षण, नोकरी, करिअर, व्यापार याबाबतीत आगामी आठवडा कसा असेल? जाणून घ्या, या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

मेष: हा आठवडा खूपच चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद असल्याचे दिसून येईल. कुटुंबीय मिळून-मिसळून काम करताना दिसतील. प्रकृतीत मात्र चढ-उतार होत असल्याचे दिसू लागेल. जास्त त्रास झाल्यास एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हितावह होईल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त करण्यासाठी परिश्रम वाढवावे लागतील. कारकिर्दीच्या बाबतीत खूपच उत्साहित असल्याने परिश्रम वाढवाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कार्यक्षेत्रातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होतील. व्यापारातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मित्रांची मदत घ्याल. प्रवास करण्याची संधी मिळेल, परंतु त्यात सावध राहावे लागेल. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी.

वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. आपण जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत करताना दिसून येईल. एखादी आर्थिक गुंतवणूक केलीत तर भविष्यात ती फायदेशीर ठरेल. प्राप्तीच्या संधी चालून येतील. नोकरीत स्थान परिवर्तनास हा आठवडा प्रतिकूल आहे. व्यापारी व्यापारात वाढ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येईल. प्रकृतीत चढ-उतार येतील. दिनचर्येत बदल करणे हिताचे होईल. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्याने अभ्यासात त्यांचे मन कमी लागेल. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.

मिथुन: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह प्रेमाचे काही क्षण व्यतीत करताना दिसेल. प्रेमीजन प्रेमिकेसह आनंदात असल्याचे दिसून येईल. घराची सजावट, रंग-रंगोटीचा विचार करत असाल तर भरपूर पैसा खर्च होईल. एखादे नवीन काम मिळत असेल तर स्वीकार विचारपूर्वक करावा. कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण विचारपूर्वक करणे आपल्या हिताचे होईल. व्यापार वृद्धीसाठी नवनवीन लोकांशी संपर्क वाढवाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यभार सुद्धा वाढेल. विद्यार्थी गप्पा-गोष्टी करण्यात जास्त वेळ घालवतील व त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे लक्ष कमी राहील.

कर्क: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबीय एकजुटीने कार्य करत असल्याचे दिसून येईल. घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होईल. प्रकृतीत चढ - उतार येतील. चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हिताचे होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक केल्यास हितावह होईल. जमिनीशी संबंधित गुंतवणूक करावयाची असल्यास चांगला फायदा होण्यासाठी ती दीर्घ काळासाठी करावी. गुरुजनांच्या सहकार्याने काही विषयांची गोडी लागेल. घर दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च होईल. वायफळ खर्च करत असल्याचे दिसून येईल.

सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत कोणतेही मोठे धाडस करू नये. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करणे हितावह होईल. प्रकृतीत चढ-उतार येतील. प्रकृतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्ती पदोन्नतीसाठी परिश्रम करत असल्याचे दिसून येईल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळवून अत्यंत खुश झाल्याचे दिसू लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्याने अभ्यासावरील लक्ष कमी होईल. माता-पिता मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतील. आत्मविश्वास उंचावेल.

कन्या: हा आठवडा सामान्यच आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. प्रेमीजन प्रेमीकेसह सुखद क्षण व्यतीत करत असल्याचे दिसेल. खर्चामुळे मानसिक तणावात असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक गरजांवर खूप खर्च होईल. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय विचापूर्वकच घ्यावा. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. काही विषयात बदल करावयाचा असेल तर तो त्वरित करावा. वरिष्ठांशी बोलावे. मित्र लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येईल. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नये. नोकरीत प्रगती होत असल्याचे दिसू लागेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. व्यापारी व्यापारात काही बदल करतील.

तूळ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजन प्रेमिकेसह सुखद क्षण व्यतीत करतील. वैवाहिक जीवनात खुशीचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल. एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास त्यात यश प्राप्त होईल. जमिनीशी संबंधित एखादी चांगली बातमी आपणास मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नये. विद्यार्थी अभ्यासाबरोबरच एखादे अंशकालीन काम सुद्धा करू शकतात. असे केल्याने ज्ञानात भर पडेल. घराच्या दुरुस्तीसाठी व सजावटीसाठी काही खरेदी कराल.

वृश्चिक: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकत्रितपणे कार्य करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती बघावयास मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष कमी राहील. मित्रांसह इकडे-तिकडे फिरताना दिसतील. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. दिनचर्येत काही बदल करावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन नोकरीच्या बाबतीत अज्ञानात राहतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. व्यापार वृद्धीसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. मनःशांतीसाठी थोडा वेळ धार्मिक कार्यात व्यतीत कराल.

धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सर्व काही ठीक असले तरी वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडा तणाव असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनात काही कारणाने गैरसमज निर्माण होऊ शकतात, जे मानसिक तणावास कारणीभूत होतील. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी घरापासून दूरवरच्या ठिकाणास प्राधान्य देतील. प्राप्तीचे अनेक स्रोत प्राप्त होतील, ज्यातून लाभ मिळवून आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत कराल. प्रकृतीतील चढ-उतार आपणास खूपच त्रस्त करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीतील प्रगतीने खुश होताना दिसतील. नोकरीत स्थान परिवर्तन संभवते. व्यावसायिकांना काही नवीन संधी प्राप्त होतील, ज्यातून लाभ घेण्यात ते यशस्वी होतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.

मकर: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजन प्रेमिकेसह आनंदाचे क्षण घालवतील. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार होत असल्याचे दिसेल. नशिबाची साथ मिळेल. थकबाकी मिळण्याची संभावना आहे. प्राप्तीस जी स्थगिती आली होती ती दूर होण्याची संभावना आहे. जे युवक राजकारणात आपली कारकीर्द घडविण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळतील व त्यामुळे त्यांची प्राप्ती वाढेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. प्रकृतीत बिघाड होताना दिसेल. एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हितावह होईल.

कुंभ: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती कुटुंबियांसह सुखात राहतील. नशिबाची साथ मिळेल. सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. एखादे कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर ते घेऊ शकता. जमीन व शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतात. कोणता ना कोणता आजार जडण्याची संभावना असून त्याने त्रस्त व्हाल. दिनचर्येत योगासन व ध्यान-धारणा समाविष्ट करणे हितावह होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.

मीन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. विवाहितांना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. घराच्या दुरुस्तीचा व सजावटीचा विचार करत असाल तर त्यात जास्त पैसा खर्च होईल. मुलांच्या अभ्यासावर जास्त खर्च होईल. अचानकपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. व्यवसायात स्थगित झालेल्या योजना पुन्हा सुरु करण्यात आपण यशस्वी व्हाल. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी परिश्रम करत असल्याचे दिसून येईल. प्रकृतीची काळजी घ्या. मनःशांतीसाठी आवडीची कामे कराल.