गुरु-सूर्य युती: ९ राशींना वरदान काळ, अचानक धनलाभ; व्यवसायात नफा, नव्या नोकरीची ऑफर शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:09 AM2024-03-21T09:09:09+5:302024-03-21T09:09:09+5:30

मंगळाच्या राशीत सूर्य आणि गुरु युती योग जुळून येत आहे. काही राशींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.

एप्रिल महिन्यात मराठी नववर्षाची सुरुवात होणार आहे. मराठी नववर्षाच्या सुरुवातीला अनेक उत्तम योग जुळून येत आहेत, असे म्हटले जात आहे. नवग्रहांचा राजा सूर्य राशीपरिवर्तन करणार असून, गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे.

मेष राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मेष राशीत गुरु आणि सूर्याचा युती योग जुळून येत आहे. या दोन्ही ग्रहांचा युती योग अतिशय महत्त्वाचा मानला जात असून, हा योग १२ वर्षांनी जुळून आल्याचे सांगितले जात आहे. १३ एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे.

सूर्याच्या मेष राशीतील संक्रमणाला मेष संक्रांती असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा तेजस्वी आणि प्रशासकीय कार्याचा कारक ग्रह आहे, तर गुरु हा ज्ञान, बुद्धी आणि भाग्य यांचा कारक ग्रह आहे. सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे अनेक राशींना सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. प्रेम जीवन रोमँटिक असेल. जोडीदारामधील बंध मजबूत होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहू शकेल.

मिथुन: उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. शुभ लाभ मिळतील. कोणत्याही कामात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. क्षमतेच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळवू शकाल. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतील. कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यावसायिक भागीदारांकडून चांगला पाठिंबा मिळेल.

कर्क: अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील. प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. धार्मिक कार्यात रस असेल. नशिबाने सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल.

सिंह: आत्मविश्वास वाढेल. शुभ फलदायी परिणाम मिळू शकतील. प्रत्येक कामात यशाची पताका फडकवू शकाल. नशिबाची साथ मिळेल. सकारात्मकतेने परिपूर्ण वाटचाल करू शकाल.

तूळ: समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. चांगली कमाई करण्यासोबतच पैसे वाचवण्यात यश मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांची प्रगती पाहून आनंदही होईल. नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण कराल.

धनु: मुलांची प्रगती होऊ शकते. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. प्रमोशन मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळतील. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. इतरांना मदत करण्यास तत्पर असाल.

मकर: सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. व्यवसाय रिअल इस्टेटशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो.

कुंभ: गुरु आणि सूर्याची युती शुभ फलदायी ठरू शकेल. नोकरदारांचे बॉसशी चांगले संबंध राहतील. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकेल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नशिबाने साथ दिल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील.

मीन: वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. संपत्ती वाढू शकेल. भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल. नियोजित योजना यशस्वी होतील. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. संवाद सुधारेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.