बुध-गुरु युती योग: ७ राशींना यशकारक, प्रगतीची उत्तम संधी; योजना गुप्त ठेवा, सुख-समृद्धी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 07:07 AM2024-03-20T07:07:07+5:302024-03-20T07:07:07+5:30

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनामुळे गुरु ग्रहाशी युती योग जुळून येत आहे. कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या...

मराठी वर्षाची सांगता होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मराठी वर्ष संपण्यापूर्वीचा मोठा सण म्हणजे होळी. यंदाच्या होळीला अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. होळीनंतर लगेचच नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे.

मेष राशीत विद्यमान स्थितीत गुरु ग्रह विराजमान आहे. मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत बुध आणि गुरु यांचा युती योग जुळून येणार आहे. एप्रिल महिन्यात बुध वक्री होणार असून, वक्री चलनाने पुन्हा मीन राशीत येणार आहे. तत्पूर्वी, मेष राशीतील बुध आणि गुरुची युती विशेष मानली जात आहे.

बुध आणि गुरु युतीचा ७ राशींना उत्तम लाभ मिळू शकतो. आर्थिक आघाडी, शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, नोकरी यांमध्ये काही गोष्टी अनुकूल ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे काय यात? जाणून घेऊया...

मेष: बुध गोचर आणि गुरु ग्रहाशी युती योगाचा प्रभाव खूपच सुखद ठरू शकेल. सामाजिक मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकेल. प्रभाव वाढेल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. योजना गुप्त ठेवून काम करणे हितकारक ठरू शकेल. दीर्घकाळापासून मुलांशी संबंधित चिंता कमी होईल.

मिथुन: बुधाचे गोचर आणि गुरु ग्रहाशी युती योग यशकारक ठरू शकेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकेल. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. दीर्घकालापासून अडकलेले वा उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित पैसे मिळण्याचे योग आहेत. एखाद्या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ चांगला यश मिळवून देणारा आहे. कुटुंब आणि भावंडांचे सहकार्य मिळू शकेल.

कर्क: बुधाचे गोचर आणि गुरु ग्रहाशी युती योग लाभदायक ठरू शकेल. फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मित्र आणि बॉस यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळू शकेल. नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करू शकता.

सिंह: संयम ठेवल्यास कठीण प्रसंगांवरही सहज मात कराल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठीही काळ चांगला जाणार आहे. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी, व्हिसा किंवा नागरिकत्वासाठी अर्ज करत असाल तर यश मिळू शकते.

तूळ: नोकरीत पदोन्नती, व्यवसायात एखादी मोठी डील होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींचेही सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास आणि तीर्थयात्रेचा लाभ मिळेल. सरकारी विभागातील कोणत्याही कामासाठी किंवा व्यवसायाच्या निविदा इत्यादीसाठी अर्ज करायचा असेल तर फायदा होण्याची शक्यता आहे.

धनु: बुधाचे गोचर आणि गुरु ग्रहाशी युती योग यशस्वी सिद्ध होऊ शकेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. कोणत्याही प्रकारची टाळाटाळ करू नका. पालकांना मुलांची काळजी कमी होईल.

कुंभ: बुधाचे गोचर आणि गुरु ग्रहाशी युती योग अधिक परिणामकारक ठरू शकणारा आहे. धाडस वाढू शकेल. धर्म आणि अध्यात्मात अधिक रस असेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन डील देखील मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.