Jupiter Venus Conjunction Pisces 2022: दोन शत्रू ग्रह एकाच स्थानी: गुरु-शुक्र युतीचा ‘या’ १० राशींना लाभच लाभ; कुणाला संमिश्र काळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:21 PM2022-04-18T14:21:47+5:302022-04-18T14:34:11+5:30

Jupiter Venus Conjunction Pisces 2022: १२ वर्षांनी मीन राशीत विराजमान झालेला गुरु आणि शुक्र यांची युती विशेष मानली असून, देश, जगावर परिणाम पाहायला मिळू शकतील, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. सर्व नवग्रह आपापले स्थान बदल करणार आहे. यापैकी नवग्रहांचा गुरु बृहस्पती आपल्या स्वराशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान झाला आहे. १२ वर्षांनी गुरु आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत आला आहे. (jupiter venus conjunction in pisces april 2022)

विशेष म्हणजे २७ एप्रिल रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. केवळ राशींवर नाही, तर देश आणि जगावरही याचे मोठे परिणाम होतील, असे सांगितले जात आहे. या कालावधीत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. (guru shukra yuti in meen rashi 2022)

गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांच्या मीन राशीतील युतीचा अनेक राशीच्या व्यक्तींना शुभ-लाभ मिळू शकेल. मात्र, काही राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी, असे म्हटले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

गुरु-शुक्राच्या युतीचा मेष राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल. दाम्पत्य जीवन आनंदी राहू शकेल. एकमेकांचा आदर-सन्मान राखला जाऊ शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. समस्या, अडचणीतून मार्ग सापडू शकेल.

गुरु-शुक्राच्या युतीचा वृषभ राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अनेक आघाड्यांवर काही ना काही लाभ प्राप्त होऊ शकतील. मात्र, हितशत्रूंच्या गुप्त कारवायांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुरु-शुक्राची युती मिथुन राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मात्र, काही आघाड्यांवर शुभवार्ता मिळू शकतील. मुलांकडून चांगल्या बातम्या कानी पडू शकतील.

गुरु-शुक्राची युती कर्क राशीच्या व्यक्तींना सुखकारक ठरू शकेल. आर्थिक आघाडी चांगली राहील. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकेल. घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. वाहन खरेदीची इच्छा वास्तवात येऊ शकेल.

गुरु-शुक्राची युती सिंह राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. समस्या, अडचणीतून बाहेर पडू शकाल. कार्यक्षेत्रात काही बदल पाहायला मिळतील. मित्रांशी असलेले नाते अधिक दृढ होऊ शकेल.

गुरु-शुक्राची युती कन्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. या कालावधीत अनेक बदल दिसून येऊ शकतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना उत्तम काळ ठरू शकेल. शुभ कार्यांमध्ये सक्रीय सहभागी होऊ शकाल.

गुरु-शुक्राची युती तूळ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. खर्चांवर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. जमा-खर्चाचा ताळेबंद योग्य ठेवला नाही, तर काही अडचणींचा सामना करावा लागू शकेल.

गुरु-शुक्राच्या युतीचा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल. सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होऊ शकाल. यश, प्रगती, सन्मान प्राप्त होऊ शकतील. तुमच्या विचारांमुळे लोकं प्रभावित होऊ शकतील. लोकप्रियतेत भरच पडेल.

गुरु-शुक्राची युती धनु राशीच्या व्यक्तींना चांगली ठरू शकेल. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळू शकतील. मित्रांसोबत पर्यटनाच्या योजना आखू शकाल. मनाला शांतता देणाऱ्या घटना घडू शकतील.

गुरु-शुक्राची युती मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. नवीन कार्य सुरू करण्याची योजना आखू शकाल. या कालावधीत ती अमलातही येऊ शकेल. आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतील. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. नोकरदार वर्गाला ही युती उत्तम ठरू शकेल.

गुरु-शुक्राची युती कुंभ राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला कालावधी आहे. नातेसंबंध दृढ होऊ शकतील. भविष्यासाठी काही विशेष योजना आखू शकाल.

गुरु-शुक्राची युती मीन राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. घरात मंगल कार्याची योजना आखू शकाल. त्यात सक्रीय सहभागी होऊ शकाल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे प्राप्त होऊ शकतील. दाम्पत्य जीवन चांगले राहू शकेल. जीवनात एखादी नवीन गोष्ट घडू शकेल.