आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:50 AM2024-05-09T06:50:02+5:302024-05-09T07:09:17+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 09 May 2024 Financial gain is possible, marriage of those who want to get married can happen. | आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील

आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील

मेष

आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा

वृषभ

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. आणखी वाचा

मिथुन

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. आणखी वाचा

कर्क

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा

सिंह

आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल.आणखी वाचा

कन्या

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा

तूळ

आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. आणखी वाचा

धनु

आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

मकर

आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. आणखी वाचा

कुंभ

आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. आणखी वाचा

मीन

 आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 09 May 2024 Financial gain is possible, marriage of those who want to get married can happen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app