Scorpio नंतर आता Bolero; कंपनी नव्या रूपात कार लॉन्च करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:44 PM2022-07-05T17:44:53+5:302022-07-05T17:48:56+5:30

स्कॉर्पिओ ही कार नवीन स्टाईलमध्ये लॉन्च केल्यानंतर आता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) बोलेरो निओ नव्या स्टाइलमध्ये लॉन्च करण्याच्या विचारात आहे.

कॉर्पिओ ही कार नवीन स्टाईलमध्ये लॉन्च केल्यानंतर आता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) बोलेरो निओ नव्या स्टाइलमध्ये लॉन्च करण्याच्या विचारात आहे. कंपनी लवकरच बोलेरो निओचे नवीन व्हेरिअंट बाजारात आणू शकते. कंपनी बोलेरो निओचे फेसलिफ्ट व्हर्जनत् बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बोलेरोचे नवीन व्हर्जन महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus) या नावाने येऊ शकते.

गेल्या वर्षी, कंपनीने TUV300 ला रिप्लेस करण्यासाठी बोलेरो निओ लॉन्च केली होती. आगामी महिंद्रा बोलेरो निओ प्लस ही TUV300 Plus ची फेसलिफ्टेड आवृत्ती असेल. यामध्ये हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिल नवीन डिझाइनमध्ये दिसू शकतात आणि कंपनी याला क्लॅमशेल बोनेटसह आणू शकते.

आगामी नवीन बोलेरोच्या साईजबद्दल बोलायचे झाल्यास, ती जुन्या व्हेरियंटपेक्षा मोठी असेल. तसेच, हे 7 सीटर आणि 9 सीटर अशा दोन्ही व्हेरिअंटसह येईल. बोलेरो निओ प्लसचे इंटिरिअर जवळजवळ बोलेरो निओ सारखेच असेल.

नव्या बोलेरोमध्ये 7 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम, पॉवर विंडो, कीलेस एन्ट्री, क्रुझ कंट्रोल, पॉवर अॅडजेस्टेबल ओआरव्हीएम, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ईको मोड एसी आणि अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात येऊ शकतात.

तसंच कारचं इंटिरिअर अतिशय साधं असेल. केबिन डिझाईन आणि डॅशबोर्ड बोलेरो नियो प्रमाणेच असेल. तसंच ही कार सहा व्हेरिअंटमध्ये सादर होण्याची शक्यता आहे.

बोलेरो निओ प्लस 2.2 लिटर डिझेल इंजिनसह मार्केटमध्ये येऊ शकते. यात मॅन्युअल आणि ऑटो गिअरबॉक्स दोन्ही पर्याय मिळतील. निओ प्लस स्टँडर्ड नियोपेक्षा मोठी असेल.

सध्या नियो ही कार 5 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यात N4, N8, N10R, N10 आणि N10 यांचा समावेश आहे. सध्या निओ मॉडेलची किंमत 9.29 लाखांपासून सुरू होते.