कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 06:30 PM2021-11-11T18:30:33+5:302021-11-11T18:32:02+5:30

दोन्ही कामाचे आदेश रद्द करताना त्यांनी पदाचा गैरवापर केला.

Two tenders worth Rs 9 crore received work order canceled; Chief in charge Dnyaneshwar Ghongade suspended | कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित

कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित

Next

गंगाखेड (परभणी ) : गंगाखेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तथा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी यानी दि.१ नोव्हेंबर रोजी तांत्रिक कारण दाखवुन दोन्ही टेंडर व कार्यरंभ आदेश रद्द करून पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

विविध प्रभागात वैशिष्ट्यपुर्ण योजनेत आठ कामे मंजुर झाली होती.यात डांबरीकरण,सिमेट रोड,नालीबांधकाम ,पेव्हर ब्लॉक आदी कामाची ई निविदा दि.१२ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली होती. दि.२९ ऑक्टोबर या कामाची निविदा मंजुर करून कार्यरंभ आदेश दिले होते.दुसरी निविदा सी.सी नाला,रस्ता,फुटपाथ करण्याची ई निविदा दि.१३ ऑक्टोबर प्रसिद्ध झाली होती.यातही दि.२९ ऑक्टोबर रोजी निविदा मंजुर करून कार्यरंभ आदेश दिले होते. ही दोन्ही कामे मे पल्लवी कन्स्ट्रक्शन परभणीच्या नावे कार्यरंभ आदेश देण्यात आले होते. या दोन्ही निविदा मंजुर करून कार्यरंभ आदेश दिलेले असताना प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगडे यानी दि.१ नोव्हेंबर रोजी कामाचे शुध्दीपत्रक काढून मे.पल्लवी कन्स्ट्रक्शन याना कार्यरंभ आदेश तांत्रिक बाबी काढून रद्द केला. दोन्ही कामाचे आदेश रद्द करताना त्यांनी पदाचा गैरवापर केला. तसेच तहसीलदार गोविद येरमे यांनी याबाबत चर्चेला बोलावले असताना आदेशाचे पालन केले नाही. यामुळे महाराष्ट्र नागरीसेवा नियमाचा भंग करून कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांना निलंबित केले.

Web Title: Two tenders worth Rs 9 crore received work order canceled; Chief in charge Dnyaneshwar Ghongade suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.