पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 08:42 PM2018-11-07T20:42:11+5:302018-11-07T20:44:06+5:30

रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण मोहिमेमुळे दोन बालके दगावल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे.

Two children vaccinated in Palam taluka was death; two are inconclusive | पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

Next

पालम (परभणी ) : तालुक्यातील रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण मोहिमेमुळे दोन बालके दगावल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे. तर दोन बालके अत्यवस्थ अवस्थेत असल्याने गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत.

राधाकृष्ण गोपाळ सकनूर वय 4 महीने व राम व्यंकटी निळे वय 1 महीना असे मयत चिमुकल्याची नावे आहेत.  6 नोव्हेंबर रोजी दूपारी दोन वाजता आरोग्य विभागाच्या कर्मचा-यानी चार बालकाना बीसीजी बूस्टर , पोलीओ व व्हीटामीन सी या सारख्या लसीकरण केले होते.  रात्री च्या सुमारास चारही बालकाना ताप आल्याने पालकानी गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान आज सकाळी आठ वाजता राधाकृष्ण सकनूर दगावला तर काही वेळा ने राम निळे याने अखेरचा श्वास घेतला. 

विद्या दतराव मखणे 2 वर्षे व लक्ष्मण व्यकंटी निळे वय 1 महीना या दोन बालकांना उपचारासाठी गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ऐन दिवाळीत ही दुखद घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ . कालीदास निरस यांचे पथक गावात दाखल झाले असून तपासणी करीत आहेत.

Web Title: Two children vaccinated in Palam taluka was death; two are inconclusive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.