सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 02:26 PM2017-08-01T14:26:18+5:302017-08-01T14:27:34+5:30

मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचे मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं.

 Social worker Hemraj Jain passed away | सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन

सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन

Next
ठळक मुद्देमराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचे मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. परभणीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांची उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

परभणी, दि.1- मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचे मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. परभणीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांची उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

जैन हे येथील मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते. तसंच पत्रकारिता क्षेत्रातसुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. विशेषतः ते प्रभावती समाचार हे दैनिक चालवित होते. जिल्हा पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट, लॉयन्स क्लब, जैन स्थानक, जिल्हा बालसुधार गृह वगैरे शेकडो संस्थांशी ते संलग्न होते. मराठवाडा विकास आंदोलन, मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मिती आंदोलनातील त्यांचं योगदान मोलाचं होतं. ते काही वर्षे काँग्रेसचे पदाधिकारी होते.

Web Title:  Social worker Hemraj Jain passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.