पाथरीत खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतक-यांचा महावितरणच्या कार्यालयास टाळे लावण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 05:33 PM2017-12-06T17:33:28+5:302017-12-06T17:36:38+5:30

महावितरण कडून पाथरी तालुक्यात थकीत वीज बिला पोटी कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत अंधपुरी येथील फिडरवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. येथे वीज पुरवठा परत सुरु करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महावितरणाच्या अभियंत्यास घेराव घालून कार्यालयास टाळे लावण्याच्या प्रयत्न केला.

for reconnecting electricity the farmers from pathari trying to lock mahavitarna office | पाथरीत खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतक-यांचा महावितरणच्या कार्यालयास टाळे लावण्याचा प्रयत्न 

पाथरीत खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतक-यांचा महावितरणच्या कार्यालयास टाळे लावण्याचा प्रयत्न 

googlenewsNext

परभणी : महावितरण कडून पाथरी तालुक्यात थकीत वीज बिला पोटी कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत अंधपुरी येथील फिडरवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. येथे वीज पुरवठा परत सुरु करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महावितरणाच्या अभियंत्यास घेराव घालून कार्यालयास टाळे लावण्याच्या प्रयत्न केला.

पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनी कडून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यासाठी वेगवेगळी पथके कार्यरत असून ते वीज खंडित करताना काही ठिकाणी फिडरवरील वीज पुरवठा बंद करत आहेत. यामुळे कृषी पंपाचा विज पुरवठा बंद झाला आहे.  तसेच प्रत्येक शेतकऱ्यांकडून 3 हजार रुपये भरल्याशिवाय त्यांची परत वीज जोडणी केली जात नाही.

या मोहिमेतच अंधपुरी येथे अंधपुरी फिडरवरील वीज 1 डिसेंबरपासून खंडित करण्यात आली. यावरील वीज पुरवठा परत सुरु करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पाथरी शाखेच्या वतीने आज सकाळी पाथरीयेथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतक-यांनी यावेळी महावितरणच्या अभियंत्यास घेराव घातला.  तसेच आक्रमक होत कार्यालयाला कुलूप लावण्याच्या प्रयत्न करण्यात आला. 

आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरिक्षक श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय रामोड दाखल झाले. त्यांनी आंदोलक शेतकरी व महावितरणच्या कर्मचाऱ्यात चर्चा घडवून आणली. चर्चेत थकीत बाकी पोटी प्रत्येक शेतकऱ्याने २ हजार रुपये भरावेत व अंधपुरीच्या फिडरवरील वीज पुरवठा परत सुरु करण्यात यावा असा तोडगा निघाला. यावर समाधान व्यक्त करत शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. 

Web Title: for reconnecting electricity the farmers from pathari trying to lock mahavitarna office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.