परभणी : पूर्णा, मानवत तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:20 AM2019-06-29T00:20:53+5:302019-06-29T00:21:34+5:30

गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात तब्बल ७८ मिमी पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले आहे़ असे असले तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़

Rainfall of heavy rains in Purna, Manavat taluka: Parbhani | परभणी : पूर्णा, मानवत तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

परभणी : पूर्णा, मानवत तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात तब्बल ७८ मिमी पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले आहे़ असे असले तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़
गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला़ काही भागात हलक्या स्वरुपाचा तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ पूर्णा तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ तालुक्यात दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता़ मात्र रात्री ९ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ सुरुवातीला मध्यम स्वरुपात असलेल्या या पावसाने काही वेळाने चांगलाच जोर धरला़ सतत अडीच तास हा पाऊस झाला़ मध्यरात्रीपासून शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे़ तालुक्यातील पूर्णा मंडळात सर्वाधिक ७८ मिमी पाऊस झाला असून, ताडकळस मंडळात १३ मिमी, चुडावा मंडळा ९ मिमी तर कात्नेश्वर मंडळात १३ मिमी पावसाची नोंद झाली़ तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०४़४० मिमी असून, आतापर्यंत २२़६० मिमी पाऊस झाला आहे़
परभणी जिल्ह्यात सरासरी ७़३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक सरासरी २२़६० मिमी पाऊस झाला असून, मानवत तालुक्यात २०़६७ मिमी पाऊस झाला़ परभणी तालुक्यामध्ये १३़२५ मिमी, गंगाखेड तालुक्यात ०़७५ मिमी, सेलू १़१७ मिमी, पाथरी ७़६७ मिमी पाऊस झाला़ विशेष म्हणजे सोनपेठ, जिंतूर तालुक्यामध्ये पाऊस झाला नाही़ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गंगाखेड, पालम, मानवत, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे़ नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़
गंगाखेड, पालममध्ये पाऊस
४शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गंगाखेड आणि पालम तालुक्यात जोरादार पावसाने हजेरी लावली आहे़ पालम शहर व परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला़
४गंगाखेड तालुक्यातही सायंकाळी ४५ मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते़ रजा कॉलनी परिसरात पावसाच्या पाण्यासह नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांनी पालिकेच्या काराभाराविषयी संताप व्यक्त केला़
४परभणी शहरात शुक्रवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले़ हलकासा पाऊसही झाला़ सोनपेठ शहरात २० मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़

Web Title: Rainfall of heavy rains in Purna, Manavat taluka: Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.