परभणी : वझर बु., येसेगाव, चांदज बनले वाळूमाफियांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:19 AM2019-02-19T00:19:04+5:302019-02-19T00:19:24+5:30

तालुक्यातील वझर, येसेगाव, चांदज या भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळूचा अवैध उपसा होत असून वाळू माफियांनी खबऱ्याचे जाळे पसरविल्याने वाळू माफिया मोकाट सुटत आहेत. एकीकडे घरकुल बांधकामाकरीता वाळू मिळत नसताना दुसरीकडे सोन्याच्या भावात वाळू विक्री होत आहे.

Parbhani: Wazar B, Yesegaon, Chandj-ul-Salmafian's Base | परभणी : वझर बु., येसेगाव, चांदज बनले वाळूमाफियांचे अड्डे

परभणी : वझर बु., येसेगाव, चांदज बनले वाळूमाफियांचे अड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यातील वझर, येसेगाव, चांदज या भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळूचा अवैध उपसा होत असून वाळू माफियांनी खबऱ्याचे जाळे पसरविल्याने वाळू माफिया मोकाट सुटत आहेत. एकीकडे घरकुल बांधकामाकरीता वाळू मिळत नसताना दुसरीकडे सोन्याच्या भावात वाळू विक्री होत आहे.
तालुक्यातील वझर येथून सर्वात जास्त वाळू उपसा सुरु आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत २५ वाहनांद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा केला जातो. एकीकडे शासकीय घरकुलांना वाळू मिळत नसताना हे वाळू माफिया सोन्याच्या भावाने चोरटी वाळू विकत आहेत. एक ट्रॅक्टर वाळूसाठी ६ ते ७ हजार मोजावे लागता. टिप्परसाठी २६ ते २७ हजार मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक पोलिसांच्या अप्रत्यक्ष सहकार्यामुळे होत आहे. वझर येथे १२ ट्रॅक्टर दररोज पूर्णा नदीच्या पात्रात असतात. ट्रॅक्टरद्वारे उपसलेली वाळू शेतात जमा केली जाते. शेतात ठिकठिकाणी ढिगारे टाकून तेथून मोठ्या वाहनाद्वारे वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. हे सर्व केले जात असताना यंत्रणेतील वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वांना मॅनेज करण्याची कला माफियांना आल्याचे दिसून येते. त्यामुळेच हे वाळू माफिया मोठ्या कारवाईपासून वाचत आहेत. वझर प्रमाणेच तालुक्यातील येसेगाव, चांदज येथून मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. या भागातील महसूल प्रशासनातील अधिकारी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने किंवा वाळू वाहतूक करणाºयासोबत आर्थिक लागेबांधे असल्याने या वाहनांवर प्रशासन कारवाई करीत नाही. सर्व सामान्य गरिबाची आर्थिक लुट होत असून घरकुल बांधकाम करणारे गोरगरीब मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे दुर्लक्षित राहत आहेत. या सर्व प्रकारणात महसूल प्रशासनातील काही अधिकाºयांचे हात ओले झाल्याची चर्चा आहे.
खबरे बनले पहारेकरी
४वारंवार कारवाई करण्याचे मनसुबे महसूल प्रशासन दाखवित असले तरी ४० कि.मी.अंतरापर्यंत प्रत्येक ५ कि.मी.अंतरावर वाळू माफियांचे खबरे आहेत. प्रशासनाची गाडी निघाली की हे खबरे संबंधितांना सूचना देऊन वाहने नदीपात्रातून बाहेर काढण्यास भाग पाडतात. प्रशासनाने कितीही कारवाईचा बडगा उगारला तरी वाळू चोरी मात्र थांबता थांबेना. त्यातही प्रशासनातील काही कर्मचाºयांचे हितसंबंध गुंतल्याने कारवाईसाठी निघालेल्या वाहनांची माहिती काही मिनिटात संबंधितांपर्यंत पोहचते. परिणामी प्रशासनाला कारवाई न करताच परत यावे लागते.
पूर्णा नदीच्या खड्ड्याचे मोजमाप व्हावे
४पूर्णा नदीतून अवैध वाळू उपसा हा प्रचंड प्रमाणात होत असल्याने या नदीतील वाळू उपसा झालेल्या जागेचे मूल्यांकन करुन तेवढी जबाबदारी वाळू माफियांवर निश्चित करुन दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. काही बढ्या राजकीय कार्यकर्त्यांनी वाहने असल्यास प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. यामुळेच की काय गरिबांना वाळूसाठी भटकावे लागत आहे. तर सोन्याच्या भावाने वाळू माफिया वाळूची विक्री करीत आहेत.
कर्मचाºयांवर कारवाईची गरज
४वझर येथून वाळू चोरीत प्रशासनातील काही कर्मचाºयांचा सहभाग आहे. पोलीस प्रशासनातील काही कर्मचाºयांची वाहने यामध्ये आहेत किंवा त्यांच्या नातलगांच्या वाहनांचा यात समावेश आहे. या भागातून वाळू चोरी त्यांच्याच मार्फत होत असल्याने आता प्रशासनाने कार्यवाही करुन कठोर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.
महसूल प्रशासन वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई करण्याबाबत आग्रेसर राहत आहे; परंतु, सोमवारी केलेल्या कारवाईत पोलीस प्रशासनातील आर्थिक हितसंबंध उघड झाले आहेत. अशाच प्रकारे आणखी कोणाचे संबंध आहेत का, याची सखोल चौकशी स्वत: आपण करून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळू.
-उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी
येसेगाव, चांदज येथे आपण स्वत: जाऊन पाहणी केली असून वझर येथेही कार्यवाही करण्याबाबत आमचा प्रयत्न सुरू आहे.
-सुरेश शेजूळ,
तहसीलदार, जिंतूर

Web Title: Parbhani: Wazar B, Yesegaon, Chandj-ul-Salmafian's Base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.